OLX प्री-ओन्ड कार्स खरेदीकर्त्यांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ

· ऑटोमोबाईल विभागातील 40,000 नोंदणीकृत व्यवसाय विक्रेत्यांमुळे महसूलामध्ये तिप्पट वाढ
· 2017 मध्ये व्यवहारांमध्ये 25 टक्क्यांची वाढ
· OLXवर भारतात 77 टक्के प्री-ओन्ड कार्सची विक्री करण्यात आली

पुणे, 5 मार्च 2018ः ऑटो, रिअल इस्टेट व वस्तू आणि सेवांकरिता भारताचे सर्वात मोठे ऑनलाईन वर्गीकृत बाजारस्थळ OLXने 40 दशलक्ष मासिक सक्रिय वापरकर्त्यांसह प्री-ओन्ड कार्सच्या वर्गवारीमध्ये आपल्या अग्रगण्य स्थानाला विस्तारित केले आहे. वर्गीकृत क्षेत्रामध्ये अग्रणी असलेल्या OLXने प्री-ओन्ड कार्सच्या खरेदी आणि विक्रीकरिता वापरण्यास सोप्या अशा माध्यमाची निर्मिती केली आहे, ज्यावर एकेकाळी ऑफलाईन असंघटित डीलर्सचे वर्चस्व होते.

ऑटोमोबाईल विभागामध्ये कार्स व बाईक्सचा समावेश असून हा 45 टक्क्यांच्या एकूण वापरकर्त्यांच्या भेटीसह प्लॅटफॉर्मवरील सर्वात मोठा विभाग आहे. OLXवर दररोज विक्रीकरिता 15,000 कार्स सूचीबद्ध होतात. यादीबद्ध करण्यात आलेल्या प्रत्येक कारला सरासरी 1000 हून अधिक व्ह्यूज मिळतात. तसेच पहिल्या आठवड्याच्या आत जवळपास 65 टक्के कार्सची विक्री होते. 2017 मध्ये प्लॅटफॉर्मवरील व्यवहारांमध्ये 25 टक्क्यांची वाढ दिसून आली. 2016 मध्ये 2.4 दशलक्ष युनिट्सची विक्री करण्यात आली होती, तर 2017 मध्ये (जानेवारी ते डिसेंबर) 3 दशलक्ष युनिट्सची विक्री करण्यात आली.

उद्योग अंदाजानुसार, प्री-ओन्ड कार्सच्या बाजाराचा आकार 3.8 दशलक्ष युनिट्सच्या मूल्याचा होता, जे असे दर्शवते की, OLXने उद्योगाच्या 77 टक्के बाजार भाग मिळवून अग्रणी स्थान प्राप्त केले आहे. व्यावसायिकदृष्ट्या पाहिले असता, प्री-ओन्ड कार्स विभागामध्ये आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये तिपटीने वाढ झाली आहे. व्यवसाय विक्रेत्यांचा सक्रिय आधार, सानुकूलित उपाय सादर व 50 शहरांतील 200 लोकांची स्थानिक विक्री पाठबळ टीम यांमुळे हे शक्य झाले आहे.

बिझनेस परफॉर्मन्सविषयी बोलताना श्री. सनी कटारिया, संचालक, ऑटो विभाग, OLX इंडिया म्हणाले, ‘‘आम्ही ऑनलाईन प्री-ओन्ड कार्सच्या ग्राहकांच्या खरेदी व विक्रीच्या मार्गामध्ये परीवर्तन करण्यावर लक्ष केंद्रित करतो. 2017 हे OLX करिता उत्तम वर्ष राहिले आहे, ज्यामध्ये आम्ही दृढ महसूल मार्गांच्या उभारणीद्वारे आणि स्थायी बिझनेस मॉडेल सादर करत आमच्या कार्स विभागामध्ये विकास साधला आहे. ऑनलाईन वर्गीकृत स्थळांची आमची सखोल जाण आम्हाला बाजाराला उत्तम उंचीवर नेण्याकरिता असे मजबूत स्थान प्राप्त करुन देते.’’
2017 मध्ये OLXने प्री-ओन्ड कार्सच्या खरेदीकर्त्यांच्या संख्येत 50 टक्क्यांची वाढ केली आहे, तर विक्रेत्यांचा आधार 100 टक्क्यांनी वाढवला आहे.