खाजगी आस्थापनांवरील कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी

Share this News:

पुणे दि. 14: विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध खाजगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी- कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी देण्यात यावी, असे निवडणूक आयोगाचे आदेश आहेत असे कामगार उप आयुक्त विकास पनवेलकरयांनी कळविले आहे.
पुणे जिल्हा क्षेत्रातील दुकाने, निवासी हॉटेल्स, खाद्यगृह, नाट्यगृह, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा अन्य आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर्स, मॉल्स, रिटेल्स आदी आस्थापनांवरील कामगार, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे कामगार आपल्या निवडणूक क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरी त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी सुटी देण्यात यावी. अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी देणे शक्य नसल्यास दोन ते तीन तासाची सुटी देता येईल. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी मालकांनी घेणे आवश्यक असेल. या संदर्भात काहीही तक्रार असल्यास संबंधित कामगारांनी संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उप आयुक्त पुणे यांनी केले आहे. 0000