poem by Shriniwas Joshi on GST issue

टक्के अठ्ठावीस सरकारी बोजा,
संगीत तिकीटां जादा झणि पैसे मोजा
जय देव जय देव जय जय सरकारा
प्राण कंठी आले, हटवा कर सारा
धनकुबेर बॉलीवूड पाचावरि सुटले
रागदारी भाळी का अठ्ठावीस आले ?
जय देव …
परंपरेचे ना तुम्ही खंदे कैवारी
वैदिक सुरांस का मग स्लॅब लक्झरी ?
जय देव …
ऐशाने सुरसरिता आटुनि जाईल
सहस्त्रकांची संस्कृती खंडित होईल
जय देव…
सुधारणा करि झडकरि कररचनेमाजी
जीएसटी काउंसीला विनवितसे आजी
जय देव
तुम्हीच रसिकलाभाचे पाहिजे केले
नाईलाजे व्यक्त व्हावे लागले
जय देव
सगळ्या सुरलुब्धांचे हृदि जे ठसठसले
श्रीनीवासे तुम्हा प्रति ते पोहोचविले…
जय देव