वीज ग्राहक तक्रार निवारण दिनाचे बुधवारी आयोजन

Share this News:

पुणे, दि. २२ जुलै २०१९

महावितरणच्या वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी सोडविण्यासाठी पुणे परीमंडळ अंतर्गत येत्या बुधवारी दि. २४ जुलै २०१९ रोजी सर्व विभागीय कार्यालयात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्याचे आदेश पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक श्री सुनील पावडे यांनी दिले आहे.

महावितरणच्या भोसरी, कोथरूड, पिंपरी, शिवाजी नगर, बंडगार्डन, नगर रोड, पद्मावती, पार्वती, रास्तापेठ, मंचर, मुळशी व राजगुरुनगर येथील विभागीय कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी १ या कालावधीत महावितरणचे अधिकारी ग्राहांकासोबत कार्यालयात संवाद साधणार असून त्यांच्या तक्रारीचा निपटारा करण्यात येणार आहे.

तक्रार निवारण्यासाठी तत्काळ कारवाई करण्यात येणार असून या संधीचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.