पुणे : शासनाचा कर चुकविण्यासाठी बनावट आर.टी .ओ.नंबरप्लेटचा वापर करुन प्रवासी वाहतुक करणाऱ्यांवर गुन्हे शाखा युनिट-५ यांची कारवाई

Share this News:

पुणे शहरातील हडपसर परिसरात आर.टी.ओ. पासिंग नंबर MH-12/KQ-6006 हा नंबर दोन वेगवेगळया लक्झरी बसवर व MH-04/FK-6299 हा नंबर दोन वेगवेगळया लक्झरी बसवर टाकलेला असल्याचे आढळून आले आहे. सदर गाड्यांपैकी MH-12/KQ-6006 या नंबरच्या दोन्ही गाडया व MH-04/FK-6299 या नंबरची एक गाडी, हडपसर येथे सनं.३७, काळेपडळ, साई मंदिराजवळ पार्क केलेल्या आहेत.

या गाड्या हडपसर मधुनच महाराष्ट्रात इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक करीत असल्याची माहिती युनिट-५ कडील पो.हवा. अमजद पठाण यांना मिळाली.

गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, माहितीनुसार तीन बस गाडया संशयास्पदरित्या थांबलेल्या दिसल्या. “त्यावेळी आम्ही या गाड्यांजवळ जात असताना आर.टी.ओ. नंबर MH-12/KQ-6006 असलेल्या दोन लक्झरी बस चालकांना आमचा संशय आल्याने ते गाडी चालु करुन पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असताना, त्यांना लागलीच पकडुन ताब्यात घेण्यात आले. सपोनि तासगांवकर यांनी त्यांना गाडी घेऊन पळुन जाण्याचे कारण व गाडीच्या कागदपत्रांची विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, सदरच्या दोन्ही गाडया श्रीराम टूर्स अन्ड ट्रॅव्हल्स यांचे देखरेखीखाली प्रवासी वाहतुक करतात. त्याचे मालक काळेपडळ, हडपसर येथील काशिनाथ केकान असुन, गाड्यांची कागदपत्रेही त्यांचेकडेच असल्याने आम्हांस काहीएक माहिती नाही. तसेच दुसरी उभी असलेली बस नं, MH-04/FK-6299 हिचेबाबत चौकशी करता त्याने सांगितले की, सदरची गाडी सोमनाथ देशमुख, रा. स.नं. २१०, लेन नं. १०, तुकाईदर्शन फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे यांचे मालकीची असुन, तिचा वापरदेखील त्यांच्या ट्रॅव्हल्स व्यवसायाकरीता होत आहे. सदर तिन्ही, ६५,६०,०००/- रु. किं.च्या गाडया ताब्यात घेऊन या प्रकरणात दोन मालक व दोन चालक, अशा एकुण चार आरोपीना अटक केली आहे,” अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, “दोन्ही लक्झरी बसचे चॅसी नंबर व इंजिन नंबर वेगवेगळे असतानाही त्यावर एकाच आर.टी.ओ. नंबरची (MH-12/KQ-6006), नंबर प्लेट लावण्यात आलेली आहे. तसेच या बसचा मूळ नंबर MH12/AU-8139 आहे, पण त्यावर बनावट आर॑.टी.ओ. MH-04/FK-6299 नंबरची नंबरप्लेट टाकुन ही गाडी महाराष्ट्र राज्य मोटार वाहन प्रादेशिक विभाग, पुणे यांनी स्क्रॅप केलेली असल्याचे माहिती असुनही वरील दोघांनी शासनाचा कर बुडवला. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही फसवणुक करीत असल्याचे आढळुन आले आहे. या बनावटीकरण केल्याचे माहिती असुनदेखील त्यावर चालक म्हणुन काम केल्याने चालकांनाही अटक करण्यात आलेली आहे.”
या प्रकरणात खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत केलेला आहे:-
१) ४०,००,००० रु. किं. ची MH-12-KQ-6006 ही बस
२) २५,००,००० रु. किं. ची MH-12-KQ-6006 ही बस (मुळ लक्झरी बस)
३) ६०,००० रु. किं. ची MH-04-FK-6299 बस
पोलिसानी एकूण ६५,६०,००० रु. किं चा मुद्देमाल जप्त केला असुन सदरबाबत हडपसर पो. स्टे. येथे गु. रजि. नं. ६४२/१९ भांदवि क. ४२०,४६५,४६८,४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन यातील वर नमुद जप्त मुद्देमालासह आरोपींची नामे खालीलप्रमाणे आहे:-
१) काशीनाथ अंबादास केकान, वय-५५, रा. केतकेश्वर कॉलनी,काळेपडळ, हडपसर, पुणे.
२) सोमनाथ अशोक देशमुख, रा.स.नं. 210, लेन नं.10, तुकाईदर्शन फुरसुंगी, ता.हवेली,जि.पुणे.
३) बालाजी मारुती सारगे, वय-२७, रा. श्रीराम टूर्स ॲण्ड ट्रैव्हल्स दुकानामध्ये, काळेपडळ, हडपसर, पुणे.(चालक)
४) बाबासाहेब यादवराव बेलकर, वय-३८, रा. गंगा व्हिलेज सोसा. समोर, गायकवाड बिल्डिंग,हांडेवाडी रोड, पुणे. (चालक)आरोपींना अटक करून पुढील कारवाईसाठी हडपसर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, पुणे शहर अशोक मोराळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, पुणे शहर शिरिष सरदेशपांडे, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-२ पुणे शहर, भानुप्रताप बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट-५ चे प्रभारी अधिकारी वपोनि श्री.दत्ता चव्हाण, स.पो.निरी. संतोष तासगांवकर, पोउपनि सोमनाथ शेंडगे, पोलीस स्टाफ अमजद पठाण, प्रदीप सुर्वे, प्रविण शिंदे, राजेश रणसिंग, दत्ता काटम, समीर शेख, राजाभाऊ भोरडे, महेश साळवी केरबा गलांडे, दया शेगर, महेश वाघमारे यांनी पार पडली आहे.