पुणे – लोणावळा रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीच्या कामामुळे दोन लोकल प्रभावित 

Share this News:

30/10/2019, पुणे-  पुणे मंडळाच्या वतीने पुणे – लोणावळा  दरम्यान रेल्वेमार्गाच्या देखभाल, दुरुस्तीचे काम दिनांक 01.11.2019 पासून 30.11.2019 पर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कालावधी मध्ये इंजीनिअरींग, सिग्नल व ओएचई विभागां कडून विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत . रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे काम करणे आवश्यक आहे. त्यामुळे वरील काळामध्ये या मार्गावरच्या दोन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पुण्याहुन लोणावळा करीता 13.00 वाजता सुटणारी गाडी संख्या 99818.

लोणावळाहुन पुण्याकरीता 14.00 वाजता सुटणारी गाडी संख्या 99813.

 प्रवाशांनी कृपया लोकल सेवेमधील वरील बदल लक्षात घेउन प्रवास करावा.