Qateel Siddiqui murder case trial begins

Share this News:

कातिल सिद्दीकी येरवडा जेल खून प्रकरणाची केस शिवाजी नगर न्यायलयात सुरू
पुणे : संशयित आरोपी कातिल सिद्दीकीचा येरवडा जैलमधील अंडा सेलमध्ये बर्मुड्याच्या नाडीने गळा आवळून खून केल्याच्या खटला शुक्रवारी(०८ जून) अतिरीक्त सत्र न्यायाधीश एस.एच. ग्वालानी यांच्या न्यायलयात ही केस सुरू झाली व फिर्यादी जेल अधिकारी चांद्रकिरण तायडे यांची साक्ष पूर्ण झाली। याप्रकरणी
कुख्यात गुंड शरद हिरामण महोळ(३४, रा. माउलीनगर, सुतारदरा कोथरूड, ता. मुळशी) आणि आलोक शिवाजीराव भालेराव (२८, रा. मु.पो. मुठा, ता. मुळशी जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी कातिल सिद्दीकी(२७, रा.बिहार) याचा येरवडा कारागृहातील अंडासेल मध्ये ८ जून २०१२ रोजी गळा आवळून खून करण्यात आला होता. या सुनावणीला मयत कातिल सिद्दीकीचा भाऊ अफरोझ इम्तियाज शेखच्या वतीने *अॅड.तोसिफ शेख व अॅड.कुमार काळेल* यांनी बाजू मांडली व मूलनिवासी मुस्लिम मंच अध्यक्ष मा अंजुम इनामदार व जेष्ट समाज सेवक मा रमेश राक्षे साहाब व आर.पी.आय. पार्टीचे नेते सतीश गायकवाड उपस्थित होते।या खटल्याची पुढील सुनावणी २२ जून रोजी होणार आहे।