अपयशाने खचून न जाता पुन्हा संघटन बांधणी करणे हीच नेहरू यांना श्रद्धांजली : सचिन साठे

पंडीत नेहरू यांना कॉंग्रेसचे अभिवादन
पिंपरी (दि. 27 मे 2019) : देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देशाची उभारणी केली. घटनाकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळे लोकशाही बळकट झाली. सतराव्या लोकसभेत कॉंग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. या अपयशाने खचून न जाता राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी संघटन बांधणीसाठी तयारीस लागावे. आगामी विधानसभेत कॉंग्रेसचा झेंडा विधानसभेवर फडकवावा हीच खरी पंडीत जवाहरलाल नेहरू यांना श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी केले.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्राधिकरण निगडी येथे सचिन साठे यांच्या हस्ते सोमवारी (दि. 27) नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सेवादलाचे राष्ट्रीय सचिव संग्राम तावडे, माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विष्णुपंत नेवाळे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस मयुर जयस्वाल, सेवादल अध्यक्ष मकरध्वज यादव, असंघटीत कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, ज्येष्ठ नागरिक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रुपनर, शहर उपाध्यक्ष सज्जी वर्की, बिंदू तिवारी, विनिता तिवारी, एनएसयूआयचे माजी शहराध्यक्ष विशाल कसबे, भास्कर नारखेडे, शशिकांत कांबळे, निर्मल तिवारी, शेख महेताब इनामदार, अनिरुध्द कांबळे, हिरामण खवळे, चंद्रशेखर जाधव, दिलीप पांढरकर, विश्वनाथ खंडाळे, शितल कोतवाल, संतोष पांडे, विठ्ठल कळसे, विष्णू खरे, एस.विटकर, तुषार पाटील, हरीदास नायर, पांडुरंग जगताप, शशिकांत कांबळे, गुंगा क्षिरसागर आदी उपस्थित होते.