कमिशन पोटी महिलांची मागणीबाबतचा अहवाल अवास्तव:डॉक्टर्स सेल

6/12/2019, पुणे :

औषधविक्रीच्या कमिशन पोटी महिलांची मागणी डॉक्टर करतात असा उल्लेख ‘ साथी ‘ ( सपोर्ट फॉर अॅडव्होकसी अँड ट्रेनिंग टू हेल्थ ) संस्थेच्या अहवालात आल्याने पुण्यातील राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने भूमिका स्पष्ट करुन हा अहवाल अवास्तव आणि सर्वच डॉक्टरांप्रती अविश्वास वाढविणारा असल्याचे म्हटले आहे.

5 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर्स सेलची बैठक पुणे कार्यालयात झाली.यामध्ये सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी भूमिका मांडली.

डॉ जगताप म्हणाले ,’ वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर्स औषध विक्रीच्या कमिशन पोटी मागण्या करतात, महिलांची मागणी करतात, असा अहवालातील उल्लेख सरसकट सर्वच डॉक्टरांची प्रतिमा डागाळणारा आहे. संबंधित संस्थेकडे जर असे गैरप्रकार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती असेल, तर ती त्यांनी वैद्यकीय संघटनांकडे द्यावी. अशा डॉक्टरांवर तथ्य तपासून कारवाई केली जाऊ शकते.

मात्र, सरसकट सगळया डॉक्टरांकडे संशयाची सुई रोखण्याचा प्रयत्न केला जाऊ नये, असे आवाहनही राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल ने केले आहे.डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टीकोण दूषीत केला जाऊ नये, मते या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

या बैठकीला डाॅ सुनिल जगताप,डाॅ हेमंत तुसे,डाॅ राजेश पवार,डाॅ सिद्धार्थ जाधव,डाॅ अजितसिंह पाटील,डाॅ सुनिल होनराव,डाॅ राजेंद्र जगताप,
डाॅ गणेश निंबाळकर,डाॅ लालासाहेब गायकवाड,डाॅ विजय वारद,डाॅ विश्वंभर हुंडेकर,डाॅ परशुराम सूर्यवंशी,डाॅ प्रताप ठुबे,डाॅ शशिकांत कदम,डाॅ सुजाता बरगाळे,डाॅ सुलक्षणा जगताप,डाॅ अर्चना पिरापघोळ,डाॅ गिरिश होनराव,डाॅ हरिष ऊंडे,डाॅ स्नेहलता ऊंडे,डाॅ अमोल ससे,सौ.अश्विनी शेवाळे उपस्थित होते.