सैनिकांबरोबर चिमुकल्यांनी केला गुढीपाडवा साजरा

Share this News:

पुणे : देशातील नागरिकांसाठी आपले घर आणि कुटुंबियांपासून असणाºया सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत साईनाथ मंडळाने व चिमूकल्यांनी गुढीपाडव्याचा सण उत्साहात साजरा केला. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या छोट्या मुलींनी सैनिकांचे औक्षण केले. घरापासून दूर असणारे सैनिक देशवासीयांच्या या प्रेमाने आणि आपूलकीने भारावून गेले. सैनिकांप्रती प्रेम व्यक्त करणा-या या निरागस चिमुकल्यांबरोबर सेल्फी घेत सैनिकांनीही गुढीपाडवाचा हा सण उत्साहात साजरा केला. यावेळी एकलव्य न्यास संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या छोट्या गुढी सैनिकांना देण्यात आल्या.

बुधावार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे गुढीपाडव्यानिमित्त कॅम्प येथील ६४ कंपनी सप्लाय डेपो मधील सैनिकांना गुढी देवून त्यांच्यासमवेत अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा सण साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नाट्यसंगीत गायिका व अभिनेत्री कीर्ती शिलेदार, ट्रस्टचे अध्यक्ष पीयुष शहा, साहिल केळकर, डॉ.विजय पोटफोडे, वसुधा वडके, प्रतिभा भडसावळे, गंधाली शहा, अभिषेक निंबाळकर, नरेंद्र व्यास, अक्षदा व्यास, चैत्राली रेणुसे आदी उपस्थित होते. यावेळी लेफ्टनंट कर्नल तुषार चौधरी कमांडिंग आॅफिसर यांनी मनोगत व्यक्त केले.
कीर्ती शिलेदार म्हणाल्या, आजचा गुढापाडवा हा सैनिकांच्या विजयाचे प्रतीक आहे. शिस्तबद्ध जीवन काय आहे हे सैनिकांकडून शिकण्यासारखे आहे. देशाची सेवा करणाºया या सैनिकांबरोबर काही आनंदाचे क्षण व्यतीत करणे हे माझे भाग्य आहे, असे सांगत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

६४ कंपनी सप्लाय डेपोतील जवान साजिन कुमार म्हणाले, तुम्ही आपुलकीने केलेल्या या कार्यक्रमामुळे मन भरून आले. सैनिकाच्या गणवेशात असताना आम्हाला भावूक होऊन चालत नाही. परंतु तुम्हा देशवासियांच्या या प्रेमामूळे मन भारावून गेले. जवान मंगेश पाटील म्हणाले, घरापासून दूर असल्यामुळे कोणतेही सण साजरा करता येत नसले तरी तुमच्या सारख्या देशवासीयांमुळे सण साजरा करण्याची संधी आज मिळाली, असे ही त्यांनी सांगितले.