भारतीय विद्या भवनमध्ये  २०  सप्टेबर  रोजी ‘सुंदरा मनामध्ये भरली ‘ कार्यक्रम

पुणे, 12/9/2019 : ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  ‘सुंदरा मनामध्ये भरली ‘  या कार्यक्रमा चे आयोजन करण्यात आले आहे . ‘स्वरश्रुती’ प्रस्तुत या कार्यक्रमात लावणीचा गायनातून सुरेल खानदानी प्रवास सादर होणार आहे ! २०  सप्टेबर (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६ वाजता  ‘भारतीय विद्या भवन’चे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह, (सेनापती बापट रस्ता) येथे हा कार्यक्रम  होणार आहे.‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.

या कार्यक्रमात  राहुल जोशी,अभिजित वाडेकर ,श्रुती देवस्थळी हे गायक आणि अमित कुटे ,राजेंद्र साळुंखे ,डॉ राजेंद्र दूरकर ,प्रसन्न बाम हे वादक सहभागी होणार आहेत प्राजक्ता मांडके –परहर या निवेदन करणार आहेत. हा कार्यक्रम विनामूल्य आहे. ‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा ८७ वा कार्यक्रम  आहे