दि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक लि. पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे पूरग्रस्तांना स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप

Share this News:

पुणे, 25 ऑगस्ट 2019 : दि मुस्लिम कॉपरेटिव्ह बँक लि. पुणे व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले गट) यांच्या वतीने ७१५ पूरग्रस्तांना रविवारी स्वयंपाकाच्या भांड्यांचे, संसारोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.

डॉ. पी. ए. इनामदार (चेअरमन, मुस्लिम को-ऑपरेटिव बँक), आमदार जगदीश मुळीक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,नगरसेविका फरजाना अयुब शेख , अॅड. अयुब शेख यांच्या हस्ते वाटप झाले.

रविवारी दुपारी नगरसेविका फरजाना अयुब शेख , अॅड. अयुब शेख ( संचालक ,दि मुस्लिम को. ऑप. बँक लि. )यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

शांतीनगर, कतारवाडी व आदर्श इंदिरानगर (येरवडा )या परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्त नागरिकांना मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी नानासाहेब परुळेकर शाळा हा कार्यक्रम झाला.

‘ नैसर्गिक आपत्तीत मदत करण्यासाठी सर्व समाजसेवक, लोकप्रतिनिधी, संस्था प्रतिनिधी धावून गेले. हेच मानवतेचे वैशिष्ट्य आहे. ही मानवता आणि सलोखा टिकवून ठेवला पाहिजे ‘ , असे प्रतिपादन डॉ.पी. ए. इनामदार यांनी केले.

याप्रसंगी नगरसेविका शीतल सावंत, अशोक शिरोळे, अध्यक्ष पुणे शहर आरपीआय (A), संजय कदम, स्वीकृत नगरसेवक, चंद्रकांत जंजिरे, स्वीकृत नगरसेवक, अशोक कांबळे, संपर्क प्रमुख आरपीआय (A), बाळासाहेब जानराव, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश आरपीआय (A) आदी मान्यवर उपस्थित होते.