पनवेलमध्ये विश्वजीत बारणे यांचा प्रचाराचा झंझावात ; तरुणाईचा तुफान प्रतिसाद  

पिंपरी, 12 एप्रिल – मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेलमध्ये विश्वजीत बारणे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरु केला आहे. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन पनवेल पिंजून काढत आहेत. आमदार ठाकूर आणि विश्वजीत बारणे दोघेही तरुण असल्याने तरुणांचा त्यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी ‘क्रेझ’ दिसून येत आहे. घाटाखालील वडिलांच्या प्रचाराची  धुरा विश्वजीत यांनी हाती घेतली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार, खासदार श्रीरंग बारणे यांचा प्रचाराचा धडाका सुरु आहे. पदयात्रा-गाठीभेटी, कॉर्नर सभा घेऊन महायुतीच्या उमेदवाराने प्रचारात आघाडी घेतली आहे. खासदार बारणे यांचे सुपुत्र विश्वजीत हे वडिलांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत.

आमदार प्रशांत ठाकूर आणि बारणे यांनी आज (शुक्रवारी)पनवेलमध्ये प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीला मोठा प्रतिसाद मिळाला. कोळीवाडा परिसर पिंजून काढला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, शिवसेना शहरप्रमुख अच्युत मनोरे, नगरसेवक राजीव सोळंके, नितीन पाटील यांच्यासह शिवसेना-भाजप महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी झाले होते.

संपूर्ण पनवेल शहरात आमदार प्रशांत ठाकूर आणि विश्वजीत यांनी प्रचारफेरी काढली. पनवेल शहर पिंजून काढले. दोघेही तरुण असल्याने त्यांना तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या प्रचारफेरीत तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तरुणांमध्ये दोघांबाबत ‘क्रेझ’ दिसून आली. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी तरुणाईने गर्दी केली होती. ” शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो””कोण आला रे कोण आला”, ”शिवसेनेचा वाघ आला”, ”येऊन येऊन येणार कोण, आप्पाशिवाय आहेच दुसरा कोण” अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.