एटीएम सेंटरवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणा-या ०५ इसमांना स्विफ्ट ‘कारसह अटक करुन त्यांचेकडुन ०२ पिस्टल, ०३ जीवंत राऊंड, कोयता, स्टील रॉड हस्तगत

Share this News:

पुणे, जुलै १०, २०१९ : वाकड पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद कदम यांना बामतीदारामार्फत बातमी मिळाली कि, काही इसम हे स्विफ्ट कार मधुन येवुन काळेवाडी चौकातील पेट्रोल पंपावरील एटीएम वर दरोडा टाकणार असुन त्यांचेकडे पिस्टल व कोयत्या सारखी घातक हत्यारे आहेत.

लागलीच त्यांनी सदरची बातमी तपास पथकाचे अधिकारी पोउनि श्री हरीश माने यांना कळविली सदर बातमीचा आशय मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. वाकड पो. स्टेशन यांना सांगितला असता त्यांनी सदरबाबत खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने पोउनि माने यांनी तपास पथकातील स्टाफला सतर्क करुन दरोडा टाकणारे इसमांकडे घातक हत्यारे असल्याने खबरदारी घेणेबाबत सुचना करुन काळेवाडी येथील बीआराटी रोडचे कडेला स्विफ्ट कारमध्ये दबा धरुन बसलेल्या ०५ इसमांना ताब्यात घेवुन त्यांना नाव पत्ता विचारता १) दुर्गेश बापु शिंदे वय ३२ वर्षे रा. दादा पाटील याचे ऑफिसमध्ये वाकड चौक वाकड पुणे मुळगाव – श्रीरामपुर जि अहमदनगर, २) प्रमोद संजय सवने वय २९ वर्षे रा. अष्टविनायक कॉलनी वाकड पुणे, ३) भैय्या /सचिन बबन जानकर वय २६ वर्षे रा. आण्णाभाऊ साठेनगर वाकड पुणे . ४) नाना उर्फ सचिन रामचंद्र शिंदे वय ३२ वर्षे रा. क्षीतीज कॉलनी वाकड पुणे. ५) रामकृष्ण सोमनाथ सानप वय ३० वर्षे रा. सध्या रा. सदगुरु कॉलनी वाकड पुणे मुळगाव – रामेश्र्वर वस्ती ता. भुम जि उस्मानाबाद.
अशी सांगितली त्यांची अंगझडती घेता त्यांचेकडे ०२ लोखंडी पिस्टल, ०३ जीवंत राऊंड, लोखंडी कोयता, मिरची पावडर, नायलॉन रस्सी, स्टील रॉड, ०५ मोबाईल हॅन्डसेट व स्विफ्ट कार क्र.
एमएच१४/सीके/११६१ असा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. आर. के. पद्मनाभन सो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. रामनाथ पोकळे सो. अतिरिक्‍त पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. विनायक ढाकणे सो, पोलीस उप आयुक्त, मुख्यालय, पिंपरी चिंचवड, मा नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्‍त सो, परी -२ पिपंरी चिंचवड, मा. श्रीधर जाधव सो. सहा.पोलीस आयुक्‍त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली श्री. सतिश माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाकड पो. स्टे, हरिश माने पोलीस उप निरीक्षक, सिद्धनाथ बाबर पोलीस उप निरीक्षक व तपास पथकातील पोलीस कर्मचारी विक्रम जगदाळे, नितीन ढोरजे, प्रमोद कदम, भैरोबा यादव, विजय गंभीरे, दिपक भोसले, शाम बाबा, विक्रम कुदळ, नितीन गेंगजे, सुरेश भोसले, सुरज सुतार, प्रशांत गिलबिले, जावेद पठाण, रमेश गायकवाड यांनी केली.