– अग्निशमन दलाने तत्परता दाखवत बादलीतील पाण्याने मिळवले आगीवर नियंत्रण

Share this News:

Punekar News's photo.पुणे : अग्निशमन दलाला नियंत्रण कक्षात रात्री ०९:१० वा. रविवार पेठेत , बागवान मस्जिदीजवळ वाडा पडल्याची वर्दि मिळाली. त्याचवेळी दलाची रेस्क्यू व्हॅन पथकासह रवाना झाली. घटनास्थळी पोहचताच वाड्याची भिंत पडली असून तेथील रहिवाशी सुरक्षित असल्याची खात्री जवानांनी केली. त्याचक्षणी दलाच्या नियंत्रण कक्षात बागवान मस्जिदीजवळ आग लागल्याची वर्दि आली.

त्याचवेळी नियंत्रण कक्षातून फायरगाडी रवाना झाली. परंतु , सुदैवाने दलाचे जवान वाडा पडल्याच्या वर्दिवर तेथेच होते. त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तेथे दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमधे प्लॅस्टिकच्या मालाला लागलेली आग बघत धाव घेतली व तेथे बादल्याच्या साह्याने पाणी मारुन आग शमवली व होणारा अनर्थ टाळला.

Punekar News's photo.विषेश बाब म्हणजे दलाकडिल रेस्क्यू व्हॅन ही फक्त अपघात वर्दिवर वापरण्यात येते व त्या वाहनात पाणी नसून ईतर साहित्य असते. तरीदेखील पाण्याच्या साठा नसताना धाडसाने हि आग जवानांनी लगेचच विझवत कर्तव्य बजावले.

या कामगिरीमधे दलाचे चालक राजू शेलार , तांडेल राजाराम केदारी व फायरमन कैलास शिंदे , मंगेश मिळवणे , शंकर नाईकनवरे , सचिन जोंजाळे , योगेश चोरघे , रफिक शेख यानी विषेश कामगिरी बजावत पुढील धोका टाळला.