अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
पिंपरी (दि. 19 जुलै 2018) मागील वर्षात शहरात महिलांवरिल अत्याचारात वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात तरूणींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. याकडे शासनाचे व पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने रविवारी (दि. २२ जुलै) शहरातून ‘महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडीट संदेश देणारी दुचाकी, चारचाकी रॅली’ काढण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी-चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, शहर प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, निकिता कदम, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, उपाध्यक्षा डिगा माधवन आदी उपस्थित होते.
२२ जुलै रोजी रविवारी सकाळी नऊ वाजता भोसरीतील शिवसृष्टी पासून रॅली सुरू होईल. पुढे संत तुकाराम नगर – भक्ती-शक्ती चौक – बास्केट ब्रिज – जगताप डेअरी – नाशिक फाटा येथून परत भोसरीतील शिवसृष्टी चौकात रॅलीचा समारोप होईल.
मागील पंधरा वर्षात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजन बद्ध सर्वांगीन विकास करण्यात आला. अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच पिंपरी-चिंचवड शहराला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. तत्कालीन केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून जेएनएनयुआरएम अंतर्गत हजोरो कोटींचा निधी विकास कामांसाठी शहराला मिळाला, यातूनच पिंपरी-चिंचवड मध्ये रस्ते, उद्याने, रुग्णालय, आवश्यक तेथे पूल व ग्रेड सेपरेटर, गरिबांसाठी घरे, खेळाडूंसाठी बहुउद्देशीय क्रिडा संकुल, शिवसृष्टी, संत शिल्प, नाट्यगृह उभारून शहराचा सर्वांगीन विकास राष्ट्रवादीच्या काळात झाला आहे, याची दखल घेऊन केंद्र सरकारने स्वच्छतेत देशात नवव्या क्रमांकाचा व राज्य सरकारने राज्यात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार देवून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा गौरव केला आहे. तसेच केंद्र सरकारने स्मार्ट सिटी पुरस्कार देवून शहराच्या विकासाची दखल घेतली आहे. हे सर्व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीमुळेच शक्य झाले आहे. अशीही माहिती पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी दिली.
शहरातील नागरिकांना वैद्यकिय सुविधा मिळावी म्हणून शहरातील यशवंतराव स्मृती रूग्णालयात कॅन्सरवरिल उपचार, आयसीयू वॉर्ड, रक्त पेढी नव्याने सुरू करण्यात आली आहे. तसेच पिंपरीतील जिजामाता रूग्णालयाचे विस्तारीकरण, थेरगावमध्ये नविन रूग्णालय, चिंचवड गावांत तालेरा रूग्णालयाचा पुर्नविकास व विस्तारीकरण, भक्ती-शक्ती चौकात देशातील सर्वात उंच राष्ट्रीय ध्वजाची उभारणी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा व स्मारक, नाशिक फाटा येथे व्दिस्तरीय उड्डाण पूल, काळेवाडी- देहू आळंदी रस्त्याला जोडणारा संत मदर तेरेसा पूल, औंध रावेत रस्त्यावर उड्डाण पूल, शहरात ठिकठिकाणी ग्रेड सेपरेटर, बास्केट ब्रिज, दापोडीत हॅरीस पूलाला समांतर पूल उभारणी, सारथी हेल्प लाईन, घरकुल व ईडब्ल्यूएस योजना, मोशी येथे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र, ऑटो क्लस्टर, ट्रॅफीक थिम पार्क, आवश्यक तेथे जलतरण तलाव, उद्यान, डायनासोर पार्क, नवी सांगवी येथे नटसम्राट निळू फुले रंगमंदीर, प्राधिकरणात नियोजित ग. दी. माडगूळकर सभागृह, भोसरीत कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह असे विविध विकास प्रकल्प शहराच्या नावलौकिकात भर घालत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केलेले कार्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी अजितदादा पवार यांच्या वाढदिसानिमित्ताने महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये दि. १२ ते १८ जुलै दरम्यान पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदार संघात पाककला स्पर्धेचे आयोजन केले होते, या स्पर्धेत अंतिम फेरित निशा परमार यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. विजेत्यांना महिला काँग्रेस शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या उपस्थितीत व माजी महापौर मोहिनीताई लांडे यांच्या हस्ते बक्षिस देवून गौरविण्यात आले. परिक्षक म्हणून प्रसिध्द शेफ प्रदिप यांनी काम पाहिले. गुरूवारी चिंचवड मोहननगर येथील राजमाता जिजाऊ विरंगुळा केंद्रात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यात महिलांची कर्करोग तपासणी, दंत चिकित्सा, नेत्र चिकित्सा, चष्मे वाटप, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तसेच रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीराचा लाभ सातशे महिलांनी घेतला. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी दिली.
