एक हात मदतीचा

Shayadri pratisthan1
Share this News:

सह्याद्री प्रतिष्ठान चाकण यांच्या वतीने दिवाळी निमित्त आदिवासी भागातील गरीब व गरजूंना मोफत कपडे व् फराळ वाटप कार्यक्रम रविवार दि १५ नोव्हेंबर रोजी उस्पुर्ता रित्या पार पडला या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष होते, काही गरीब व गरजू लोकांच्या घरी आर्थिक परिस्तिति मुळे दिवाळी साजरीही केली जात नसेल, ज्या लोकांना अंगावर घालण्या साठी वेवास्तीत कपडे घेत येत नाहीत अश्या लोकांसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने उपक्रम राबवून खेड तालुक्यातील भीमाशंकर येथील दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी,ठाकर व कातकरी समाजातील लोकांना फराळ,महीलांना साड्या ,लहान मुलांची कपडे, मुलीं साठी ड्रेस,पुरूषां साठीची कपडे, तसेच फळे,बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले. ह्या वस्तू खेड तालुक्यातील भोरगिरी परिसरातील कडधे, धामणगाव, एकलहरे, टेकवडे, डेहने, ठाकर वस्ती तसेच भीमाशंकर परिसरातील वाड्या वस्त्या येथे वाटण्यात आल्या. ह्या उपक्रमाला आदिवासी जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. ऐन दिवाळीत सर्व प्रकारचा फराळ आणि चांगले कपडे मिळाल्याने आदिवासी आणि बच्च्चे कंपनीचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.सुमारे हजारो आदिवासीनी याचा लाभ घेतला.

हा उपक्रम यशस्वी करण्यात चाकण व जवळच्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील दिवाळी फराळ व वापरत नसलेली जुनी कपडे प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांन सुपूर्त केले तसेच कार्यकर्त्यांनी घरोघरी जाउन संपूर्ण कपडे व फराळ जमा केले व नंतर त्याची व्यवस्तीत रित्या पॅकिंग करून गरजू लोकांपरियंत पोहोचवण्यात आला. त्या वेळी गावातल्या सभासदांनी आमच्या उपक्रमाचे व ज्या नागरिकांनी फराळ व कपडे संस्थे कडे जमा केली अश्या नागरिकांचे त्यांनी कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. या वेळी सह्याद्री प्रतिष्ठान चाकणचे अध्यक्ष प्रतिक जाधव, सतीश नांगरे, विशाल बारवकर, प्रशांत टोपे, गोकुळ गोरे, किरण गाडे, सुरज नाणेकर, कुणाल कड, अशोक घीगे,सुदर्शन टोपे, योगेश मेदनकर, विशाल झरेकर, रवींद्र भोगाडे, अभिषेक जैद. रोहित गोंडवळ, अक्षय लोणारे, श्रीकांत ढगे, तुषार भालेराव, धीरज बिरदवडे, अखिल पठाण, प्राषिक भोसले, अक्षय लांडे, श्रीधर नायकवडी, अमित कड, विशाल दवणे,सागर खैरे, तसेच महिला कार्यकर्ता सौ. रेखाजी दलाल आदि कार्यकर्ते उपस्तीत होते. या सर्व कार्यकर्त्यांच्या परिश्रमाने उपक्रम यशस्वी रित्या पार पडला, पुढील काळात असेच अनेक सामाजिक उपक्रम सह्याद्री प्रतिष्ठान राबवेल.

‪#‎Social‬ ‪#‎help‬ Shayadri Prathisthan