एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी दंत तपासणी शिबीर
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला दंत महाविद्यालयातर्फे वारकऱ्यांसाठी मोफत दंत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.कै. भिकूबाई मेनकुदळे पंचम लिंगायत ट्रस्ट , कस्तुरी चौक ( गणेश पेठ ) येथे रविवार दि. ८ जुलै रोजी सकाळी १० ते ४ वेळेत हे शिबीर होणार आहे.
दंत तपासणी, औषध वाटप, आणि दंतमंजन -टूथपेस्ट वाटप असे या उपक्रमाचे स्वरूप असल्याची माहिती प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल, रजिस्ट्रार आर.ए. शेख, महाविद्यालयाच्या सार्वजनिक दंत चिकित्सा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका नगराळे यांनी पत्रकाद्वारे दिली.
या उपक्रमाचे हे १२ वे वर्ष आहे.
