ऑनलाईन वीजबिल भरण्यासाठी सेवाशुल्कमाफक ग्राहकांनी ऑनलाईनद्वारेच वीजबीलभरावे: महावितरणचे आवाहन

Share this News:

मुंबई, दि. 07 फेब्रुवारी 2018: महावितरणने राज्यातील सर्व ग्राहकांनाऑनलाईन पध्दतीद्वारे वीजदेयक भरण्याची सुविधा2005 पासून उपलब्ध करुन दिली आहे. ग्राहकमहावितरणच्या www.mahadiscom.in यासंकेतस्थळावर तसेच महावितरणच्या मोबाईल ऍ़पद्वारेकेंव्हाही कुठूनही ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचाभरणा करु शकतो. या प्रणालीची कार्यपध्दतीमहावितरणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. सदरपध्दतीमध्ये वीजग्राहक त्यांच्या वीजदेयकाचा भरणाक्रेडीट / डेबीट कार्ड, नेट बँकींग यु.पी.आय. इत्यादीइलेक्ट्रॉनिक माध्यमांमार्फत करु शकतो. या सुविधेसाठीसेवाशुल्क अत्यंत माफक आहेत. त्यामुळे या सुविधेचालाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

ऑनलाईन पध्दतीने वीजदेयकाचा भरणा करणेअत्यंत सुरक्षित असून, सदर पध्दतीस आर.बी.आय.च्यापेमेंट सेटलमेंट कायदा 2007 च्या तरतूदी लागूआहेत. ऑनलाईनने वीजदेयक भरणा केल्यासग्राहकांना त्वरीत एसएमएस भरणा पावती दिली जाते.सद्यस्थितीत महावितरणचे 30 लाख ग्राहक सदरसुविधेचा लाभ घेत असून यातून दरमहा महावितरणलाऑनलाईन वीजबील भरणा पध्दतीद्वारे साधारणत: रु.600 कोटी महसुलाची प्राप्ती होते.

अशा प्रकारच्या देयकभरणा प्रणालीमध्येमास्टर, व्हीजासारख्या संस्था (Payment Gateway Service Provider Agencies) क्रेडीट/ डेबीटकार्ड, इत्यादी इलेक्ट्रॉनिक माध्यमामार्फत देयक अदाकरण्याच्या सुविधांसाठी सुविधा शुल्क आकारतात.याबाबतीत महावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारेसुविधा शुल्क अत्यंत माफक वाजवी आहेत. इतरराज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या तुलनेतमहावितरणच्या ग्राहकांना आकारले जाणारे सुविधाशुल्क अत्यंत कमी आहेत.

महावितरणच्या ग्राहकाने क्रेडीट/डेबीट कार्ड,यु.पी.आय. मार्फत वीज देयकाचा भरणा केल्यास रुपये500 पर्यंत कोणतेही सुविधा शुल्क आकारले जात नाही.तसेच नेटबँकींगद्वारे कितीही रकमेपर्यंतचा वीजदेयकाचाभरणा केल्यास त्याला कोणत्याही प्रकारचे सुविधा शुल्कभरावे लागत नाही. या दोन्हीही पर्यायासाठीच्या सुविधाशुल्काचा भरणा महावितरण मार्फत करण्यात येतो.

ऑनलाईन पध्दतीने वीजबिल भरणा करण्याबाबतकाही अडचणी असल्यास त्यासंदर्भातील तक्रारीनिवारण करण्यासाठी महावितरणने एक स्वतंत्र मदतकक्ष स्थापन केला असून,[email protected] या ई-मेलआयडीवर मेल केल्यास ग्राहकांच्या तक्रारींचे निवारणकरण्यात येते. त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनीमहावितरणचे मोबाईल ऍ़प संकेतस्थळामार्फतऑनलाईनद्वारेच वीजबील भरावे या सुविधेचा लाभघ्यावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.