‘तो’ विजेचा खांब महावितरणचा नव्हे

Share this News:

पुणे, दि. 28 जून 2018 : निगडी प्राधिकरण येथील विद्युत खांबाचा शॉक लागल्याने मंगळवारी (दि. 26) एका नऊ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा वीजखांब पथदिव्याचा असून तो महावितरणच्या वीजयंत्रणेशी संबंधीत नाही. तरी या प्राणांतिक विद्युत अपघात प्रकरणी महावितरणकडून विद्युत निरीक्षक विभागाला कळविण्यात आले आहे.