Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

नेटसर्फ नेटवर्क या भारतातील अग्रगण्यडायरेक्ट सेलिंग कंपनीला 2017-18 मध्ये महाराष्ट्रातील व्यवसायात100% वाढीची आशा

Support Our Journalism Contribute Now

पुणे, ऑक्टोबर 10, 2017: डायरेक्ट सेलींग ही व्यापाराची एक वेगळी विपणन पद्धती आहे ज्यामध्ये एक व्यक्ती दुसर्‍या व्यक्तीला दुकानाव्यतिरिक्त ठिकाणी, म्हणजे घरी किंवा ऑफिसमध्ये, प्रॉडक्टचे प्रात्यक्षिक देऊन विक्री करते. महाराष्ट्र हे आपल्या देशातील सर्वात प्रगत राज्यांमधील एक आहे. महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये इथल्या मुंबई, पुणे, नाशिक व नागपुर यांसारख्या महत्वाच्या शहरांचा प्रमुख वाटा आहे. महाराष्ट्र हा भारतातील प्रगत औद्योगिक राज्यांपैकी एक असुन अनेक मोठ्या कंपन्यांची येथे कार्यालये आहेत. इथला ग्राहकही प्रगत आहे आणि म्हणूनच डायरेक्ट सेलींगच्या क्षेत्रातही महाराष्ट्राची कामगिरी लक्षात घेण्यासारखी आहे. महाराष्ट्रात या क्षेत्राची वार्षिक आर्थिक उलाढाल रु. 780 कोटी इतकी असून डायरेक्ट सेलर्सची आकडेवारी 6.4 लाख इतकी आहे.

नेटसर्फ नेटवर्क या कंपनीने गेल्या 16 वर्षांच्या आपल्या अनुभवातुन डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायाची परिभाषाच बदलली आहे.नेटसर्फच्या डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायाचे मॉडेल हे वापरा आणि इतरांना सुचवा अशा साध्या सोप्या पध्दतीवर आधारले आहे. भारतात सैंद्रिय कृषी उत्पादने शेतकर्‍यांपर्यंत डायरेक्ट सेलींगच्या माध्यमातून पोहोचवणारी नेटसर्फ ही एकमेव कंपनी आहे. आज नेटसर्फ नेटवर्क भारताच्या 22 राज्यांत पसरले असून, कंपनीची गेल्या आर्थिक वर्षाची उलाढाल रु. 150 कोटी होती.

नेटसर्फ व पुणे, महाराष्ट्र

नेटसर्फने 2001 साली डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायाची सुरवात पुण्यातूनच केली होती.कंपनीने तेव्हा ऑरगॅनीक फारमिंगच्या प्रॉडक्टस्नी सुरवात केली होती त्यामुळे कंपनीचे नेटवर्क महाराष्ट्राच्या गावाखेड्यातून जलद गतीने पसरले. नंतर ते कर्नाटक, मध्यप्रदेश आणि गुजरात मध्येही जाऊन पोचले. आज नेटसर्फ नेटवर्क महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पसरले असून नेटसर्फची पुणेमुंबई येथे कार्यालयेही आहेत. नेटसर्फचे महाराष्ट्रात 84 स्टॉक पॉइंटस्(प्रॉडक्ट वितरण केंद्रे) आहेत. वैशिष्ट्य म्हणजे या कंपनीच्या नेटवर्कचा विस्तार केवळ मोठ्या शहरात नसून हे नेटवर्क शेतीच्या प्रॉडक्टस्मुळे महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले आहे.नंतरच्या काळात शहरांमध्ये व्यवसाय पोहोचवण्याच्या उद्दिष्टाने नेटसर्फने हेल्थ केअर,पर्सनल केअर आणि होम केअर अशा प्रॉडक्टस्ची निर्मिती केली. आजमितीला महाराष्ट्रात नेटसर्फ नेटवर्कची उलाढाल रु. 44.8कोटी (नेटसर्फच्या एकूण उलाढालीच्या 36%)इतकी असून ती पुण्यात रु. 11.61 कोटी एवढी आहे. पुण्यामध्ये नेटसर्फचे 5,000 हून अधिक अ‍ॅक्टिव्ह डायरेक्ट सेलर्स कार्यरत आहेत.

प्राकृतिक व हर्बल प्रॉडक्टस्

कुठल्याही डायरेक्ट सेलींगच्या व्यवसायाचे भवितव्य त्या कंपनीने कुठली व किती दर्जेदार प्रॉडक्टस् तयार केली आहेत यावर अवलंबून असते. नेटसर्फने नेहमीच बाजारात संपूर्णतः प्राकृतिक व हर्बल प्रॉडक्टस् आणली आहेत.आजकाल बहुतांशी भारतीय ग्राहक नैसर्गिक जीवनशैली स्वीकारत आहेत व त्यांच्याकरिता नेटसर्फची उत्पादने सुयोग्य आहेत. नेटसर्फचे 4ब्रँड आहेत ज्यातील प्रॉडक्टस्ची निर्मिती व मार्केटींग नेटसर्फ कंपनी स्वतः करते. ते ब्रँडस् आहेत बायोफिट अ‍ॅग्रीकल्चर (महाराष्ट्रातील उलाढाल 46%), नॅचरामोअर हेल्थ केअर(महाराष्ट्रातील उलाढाल 34%), हर्ब्ज अँड मोअर पर्सनल केअर (महाराष्ट्रातील उलाढाल 20%)आणि नव्याने बाजारात आलेला ब्रँड क्लीन अँड मोअर होम केअर. महाराष्ट्रातील सर्वात जास्त चालणारी उत्पादने आहेत स्टिमरिच,शेत, नॅचरामोअर फॉर विमेन, नॅचरामोअर(व्हॅनिला) व बायो-95.

युवा पिढीसाठी डायरेक्ट सेलिंग

कुठल्याही उद्योगाचे भविष्य हे त्या देशातील युवा पिढीच्या हाती असते आणि डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय याला अपवाद नाही. या व्यवसायाचे भविष्य उज्वल करण्याच्या उद्दिष्टाने येत्या काही वर्षात अधिकाधिक तरुण व्यक्तिंनी या व्यवसायाशी जोडले जावे अशी नेटसर्फची अपेक्षा आहे. आजकाल लोकांना सेमिनारसाठी गोळा करणे हे त्यांच्या व्यस्त जिवनशौलीमुळे कठिण होऊन बसले आहे ही वस्तुस्थिती नेटसर्फ कंपनी समजुन घेते आहे. त्यामुळे नेटसर्फने फेसबुक, युट्युब वरुन लाईव्ह वेबिनार घेण्यास सुरुवात केली आहे. नेटसर्फचा डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय हा आता घरोघरी जाऊन करण्याचा राहिला नसुन त्याचे नवे स्वरुप स्क्रीन टू स्क्रीन असे झाले आहे. या व्यवसायाची सर्व कामे नेटसर्फच्या मोबाईल अ‍ॅप वरुन सहज करता येतात. आज 75 हजारांहून अधिक डायरेक्ट सेलर्स नेटसर्फचा व्यवसाय हा नेटसर्फच्या मोबाईल अ‍ॅप वरुन करतात.

बरेचदा असे पहाण्यात येते की एखाद्या ग्राहकाला डायरेक्ट सेलिंगचे प्रॉडक्ट आवडलेले असते परंतु तो ते पुन्हा विकत घेण्यास असमर्थ ठरतो कारण ही खरेदी कुणाकडून व कशी करायची याची माहिती त्याला नसते. किंवा कधी ग्राहकाला डायरेक्ट सेलिंग कंपनीच्या प्रॉडक्टची एखादी जाहिरात दिसते, त्यांना ते प्रॉडक्ट विकत घ्यावेसे वाटते परंतू त्यासाठी त्यांच्याकडे कुठल्याही डायरेक्ट सेलरचा फोन नंबर नसतो.ही परिस्थिती लक्षात घेता नेटसर्फने एक जिओ लोकेशनवर आधारित जिओ रिटेलर ही सिस्टिम सुरु केली आहे. ज्याच्या माध्यमातून ग्राहक व डायरेक्ट सेलर्स मधील तफावत कमी करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.

त्यामुळे डायरेट सेलिंगचा व्यवसाय करण्याच्या नवनविन पध्दती अवलंबणारी नेटसर्फ ही भारतातील अग्रगण्य कंपनी आहे.

रोजगार संधी

सुशिक्षित, प्रोफेशनल्स्, अशिक्षित किंवा अर्धशिक्षित, शेतकरी, ब्युटिशिअन्स्, डॉक्टर्स यांपैकी सर्वांसाठी नेटसर्फचा डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय फायदेशिर आहे. महाराष्ट्रातील टॉप 5व्यवसाय केंद्रे आहेत पुणे, सोलापुर, ठाणे, मुंबई आणि सांगली. महाराष्ट्रातील व्यक्तिंमध्ये डायरेक्ट सेलिंगच्या व्यवसायासाठी लागणारी क्षमता पुरेपूर आढळते त्यामुळे नेटसर्फ त्यांना उत्तमोत्तम ट्रेनिंगस् व इंसेंटिव्हज् देते.

स्त्रियांचे सबलीकरण

आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्याने स्त्रियांचा आत्मविश्वास व त्यांचे कौटुंबिक स्वास्थ्य कमालीचे सुधारते. नेटसर्फचा डायरेक्ट सेलींगचा व्यवसाय स्त्रियांकरिता चांगलाच फायदेशीर ठरला आहे कारण या व्यवसायाची कार्यपद्धती अत्यंत लवचिक असून त्यामुळे स्त्रियांना सांसारिक जबाबदार्‍या व डायरेक्ट सेलिंगचे काम यातील ताळमेळ राखता येतो व स्वतःचे उत्पन्न कमावता येते. महाराष्ट्रातील डायरेक्ट सेलर्स पैकी 58 टक्के या स्त्रिया असून अ‍ॅक्टिव्ह डायरेक्ट सेलर्स स्त्रियांची (ज्यांना अस्मिता म्हणून संबोधले जाते) संख्या 7,000 आहे.महाराष्ट्रातील टर्नओव्हरच्या 39% टर्नओव्हर या अस्मितांनी मिळवलेला आहे.

डायरेक्ट सेलींगच्या गाईडलाईन्स वर्ष2016

प्रत्यक्षात अस्तित्वातच नसलेल्या गोष्टींमध्ये सामान्य व्यक्तींना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक करणार्‍या काही कंपन्यांच्या गैरव्यवहारांना आळा घालण्याच्या दृष्टीने भारत सरकारने नव्याने लागू केलेल्या डायरेक्ट सेलींग गाईडलाईन्सची बातमी अत्यंत स्वागतार्ह आहे. या बातमीमुळे या इंडस्ट्रीच्या वृद्धी बाबत आणि ग्राहकांचा विश्वास जपण्याबाबत नेटसर्फ अत्यंत आशावादी आहे.नेटसर्फ आपल्या 3600 ऑनलाईन इकोसिस्टिम, मोबाईल अ‍ॅप व ॠखज रिटेलर सिस्टिमच्या माध्यमातून अधिकाधिक पारदर्शकता व व्यवसाय करणे सोपे बनवण्याकरिता प्रयत्नशील आहे. सध्या जास्तीत जास्त डायरेक्ट सेलर्स ॠखज रिटेलर अ‍ॅपचे रजिस्ट्रेशन करीत आहेत.

GST

नेटसर्फ GST च्या आगमनासाठी सुसज्ज आहे.कंपनीने सर्व 22 राज्यांमध्ये ॠडढ चे रजिस्ट्रेशन केले आहे. त्याचप्रमाणे नेटसर्फच्या व्यवसायाशी सल्लग्न असलेल्या इतर व्यवसायधारकांनी त्यांच्या करव्यवस्थेत होणारे सर्व बदल आत्मसात केले आहेत. GST मुळे नेटसर्फची काही प्रॉडक्टस् आणखी स्वस्त झाली आहेत.उदाहरणार्थ, शेतीशी संबंधीत प्रॉडक्टस्वरील कर6.5% वरुन 5% इतका झाला तसेच आयुर्वेदिक प्रॉडक्टस्वरील कर 13.5% वरुन 12% इतका कमी झाला आहे. नेटसर्फसोबत काम करणार्‍या सर्व भागीदारांना नेटसर्फने व्यवस्थित प्रशिक्षण दिले आहे. त्याचप्रमाणे नेटसर्फ तांत्रिकदृष्ट्या सशक्त असल्यामुळे, नेटसर्फने एक आधुनिक एठझ मोडयूल तयार केले असून त्यामुळे नेटसर्फच्या डायरेक्ट सेलर्सना व विक्रेत्यांनाGST चा हिशोब करणे आता सोपे जाणार आहे.

पुढील वाटचाल

KPMG च्या 2014 मधील रिपोर्टनुसार,महाराष्ट्रातील डायरेक्ट सेलींग क्षेत्राची आर्थिक उलाढाल साल 2025 मधे रु. 7000 कोटींवर जाऊन पोहोचण्याची शक्यता आहे.

आज रुपये 45.8 कोटी इतका महाराष्ट्रातील टर्नओव्हर असलेल्या नेटसर्फ कंपनीला खात्री आहे की पुढील आर्थिक वर्षात ही आकडेवारी दुप्पट झाली असेल, म्हणजेच 100% वाढ.नेटसर्फने त्याकरिता आवश्यक गुंतवणूक करण्यास सुरवात केली आहे. जसे की,नेटसर्फची सिक्कीम येथील नवीन फॅक्टरी.

महाराष्ट्रातील उलाढालीतील वाढीच्या प्रमाणात नेटसर्फला पुण्यातील व्यवसायाच्या उलाढालीतही आशादायक वाढ अपेक्षित आहे.

महाराष्ट्रातील सर्व तालुक्यांमध्ये आपले नेटवर्क पसरवण्यात नेटसर्फ नेटवर्क यशस्वी ठरले आहे.आता नेटसर्फचे उद्दिष्ट महाराष्ट्रामध्ये, खास करुन इथल्या शहरी भागांमध्ये, पर्सनल केअर व हेल्थ केअर प्रॉडक्टस्ची अधिकाधिक विक्री करणे हे आहे.

कुठल्याही व्यवसायाचे भविष्य तो करणार्‍या तरुण व्यक्तींच्या सहभागावर अवलंबून असते.नेटसर्फची अपेक्षा आहे की अधिकाधिक तरुण व्यक्ती हा व्यवसाय सुरु करतील. त्या दृष्टीने नव्या पिढीला आपलेसे वाटतील असे अनेक बदल नेटसर्फने आपल्या कार्यपद्धतीत करण्यास सुरवात केली आहे.

नेटसर्फने आपले स्वतःचे इकॉमर्स पोर्टल,नेटसर्फ नेटवर्क अ‍ॅप व जिओ सिस्टिम सुरु करुन तंत्रज्ञानामध्ये आपला हातखंडा असल्याचे दाखवून दिले आहे. नेटसर्फ हे डायरेक्ट सेलिंगचा व्यवसाय डोअर टू डोअर पासून स्क्रिन टू स्क्रिन कडे नेण्या करिता सतत कार्यरत राहील.

Punekar News is now on Telegram. For the latest Pune, Pimpri Chinchwad PCMC news, Like our Facebook Page, follow on Twitter and Instagram and also subscribe to Punekar News on Telegram.