फर्निचर- निर्मिती क्षेत्रातील उत्पादक आणि व्यापाऱ्यांना इंडिया वूड मध्ये सहभागी होण्याची संधी
लाकूडकाम व फर्निचर उत्पादन उद्योगासाठी आशियाचा सर्वात मोठा व्यापार मेळावा इंडियावूड 2018 बीआयईसी, बंगळुरू येथे आधुनिक नाविन्यता व ट्रेण्ड्स दाखवण्यास सज्ज आहे. इंडियावूडचे 10वे पर्व 8 ते 12 मार्च 2018 दरम्यान आयोजित करण्यात येईल आणि लाकूडकाम उद्योगातील समुदाय पुन्हा एकदा बंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रामध्ये एकत्र येतील.
इंडियावूड 2018 मध्ये 22 राज्यांमधील 850 हून अधिक प्रदर्शक, 12 देशांचे पॅव्हेलियन्स, जगभरातील 40 देशांचा समावेश असेल. यंदा इंडियावूडला इंदौर, मध्यप्रदेश या शहरांमधून प्रचंड प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. या शहरांमधील उद्योगाला मोठी गती व चालना मिळाल्याचे दिसून आले आहे. हा मेळावा फर्निचर उत्पादन तंत्रज्ञाने, लाकूडकाम मशिनरीज, टूल्स, फिटिंग्ज, साहित्ये, कच्चा माल व उत्पादनांची व्यापक रेंज सादर करण्यासाठी व्यासपीठ देखील देतो.
14वी सर्वात मोठी फर्निचर बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे भारतीय फर्निचर उद्योग प्रतिवर्ष 20 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे आणि हा उद्योग 2019 पर्यंत 32 बिलियन अमेरिकन डॉलर्सचा टप्पा पार करण्याच्या टप्प्यावर आहे. वाढत्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भारतातील फर्निचर उत्पादन क्षेत्र आता यांत्रिकी प्रक्रियांवर आधारित उद्योगात बदलत असले तरी आजही जवळपास 60 टक्के फर्निचर इतर देशांमधून आयात केले जात आहे. इंडियावूड सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व माहिती प्रसार भारतीय उद्योगाला मलेशिया व चीन सारख्या देशांची स्पर्धा करण्यामध्ये आणि निर्यात बाजारपेठा सुरू करण्यासह आयातीचे प्रमाण मर्यादित करण्यामध्ये सक्षम करेल.
इंडियावूड 2018 बाबत माहिती सांगत पीडीए ट्रेड फेअर्सचे उपाध्यक्ष शिवाकुमार व्ही म्हणाले, इंडियावूड हे आधुनिक लाकूड व फर्निचर उद्योगाला आकार देणारे सर्वोत्तम तंत्रज्ञान व ट्रेण्ड दाखवण्यासाठीचे धोरणात्मक व्यासपीठ मानले जाते, हे प्रत्येक पर्वामधील प्रदर्शक व देशांच्या वाढत्या संख्येमुळे सिद्ध होत आहे. इंडियावूड सारख्या प्रदर्शनाच्या माध्यमातून तंत्रज्ञान व माहिती प्रसार भारतीय उद्योगाला निर्यातीचे प्रमाण वाढवण्यामध्ये सक्षम करेल. भागधारकांचे सातत्यपूर्ण पाठबळ आणि सर्वोत्तमतेशी कटिबद्ध असलेले इंडियावूड राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळ्यांवरील उद्योगांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची खात्री घेते.
हे प्रदर्शन भारतातील प्रथम, द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील, तसेच आग्नेय आशियाई देश आणि नेपाळ, श्रीलंका, बांग्लादेश, मलेशिया, मान्यमार, भूतान, थायलंड, इंडोनेशिया, फिलिपाइन्स इत्यादींसारख्या दक्षिण आशियाई देशांमधील कारागीर, सुतार, फर्निचर उत्पादक, हार्डवेअर वितरक/ डिलर्स/ उत्पादक, प्लायवूड व पार्टिकल बोर्ड उत्पादक/ ट्रेडर्स, लाकडी उत्पादनांचे उत्पादक, आर्किटेक्ट्स, इंटेरिअर डिझाइनर्स, बिल्डर्स आणि लाकडीकाम इकोप्रणालीला आमंत्रित करते. इंडियावूडमध्ये प्रदर्शक पॅनेल व भक्कम लाकडी प्रक्रिया, फर्निचर प्रक्रिया, सॉ मिलिंग, फिटिंग्ज, फर्निचर किचन व कॅबिनेट्रीसाठी हार्डअवेर व साहित्ये, पुरवठा शृंखलेसाठी कच्चा माल अशा विभागांमधील नवीन उत्पादने सादर करतील.
