Warning: sprintf(): Too few arguments in /var/www/wp-content/themes/covernews/lib/breadcrumb-trail/inc/breadcrumbs.php on line 254

बजमे रहेबर कमिटीच्यावतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गौरव पुरस्काराचे वितरण उत्साहात संपन्न

पुणे कॅम्पमधील बजमे रहेबर कमिटीच्यावतीने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम गौरव पुरस्काराचे वितरण उत्साहात संपन्न झाले . या पुरस्कारअंतर्गत मोहम्मद पैगंबर जयंती , सार्वजनिक गणेशोत्सव , डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती , वीर गोगादेव जन्मोत्सव व मोहरम आदी उत्सवामधील आदर्श मंडळे , आदर्श सामाजिक कार्यकर्ते व आदर्श सामाजिक संस्था यांचा सन्मानचिन्ह देउन गौरव करण्यात आला . कॅम्पमधील सुफी घराण्याची परंपरा लाभलेल्या ९९ वर्षीय मिलादखा हाजी कासम बियाबानी यांचा सन्मानचिन्ह देउन विशेष सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे आयोजक बजमे रहेबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी केले . यंदाच्या कार्यक्रमाचे आठवे वर्ष आहे .
या कार्यक्रमास पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे , माधुरी गिरमकर , प्रसाद केदारी यांच्याहस्ते ह्या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले . यावेळी हाजी उस्मान तांबोळी , हाजी इसाक चावीवाले , इकबाल अन्सारी , मुस्ताक पटेल , अजीम गुडाकूवाला आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास भांबुरे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इरफान मुल्ला , अविनाश पुणेकर , फैय्याज शेख , तौफिक शेख , अतिश कुराडे , अन्वर शेख , जमीर शेख , अशोक देशमुख , फैय्याज खान आदींनी परिश्रम घेतले .

बजमे रहेबर कमिटीचे अध्यक्ष अक्रम शेख यांनी सांगितले कि , गेली सात वर्षांपासून आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून पुणे कॅम्पभागातील सर्व धर्मीय उत्सवामध्ये चांगले कार्य करणाऱ्या व्यक्ती , संस्थां व सार्वजनिक गणेश मंडळाचा सन्मान करीत आहोत .

बजमे रहेबर कमिटीने सर्व धर्मीय उत्सवातील आदर्श मंडळे तसेच आदर्श साहजिक कार्यकर्ते व सांठा यांचा सन्मान करून धार्मिक एकोपा राखण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे . असे मत लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी व्यक्त केले . तर धार्मिक व सामाजिक कार्य करून समाजात राष्ट्रीय एकात्मतेचा अबाधित राखणाऱ्या मंडळ व कार्यकर्त्याचा सन्मान करून बजमे रहेबर कमिटीने त्यांना प्रोत्साहन दिले आहे . असे मत यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड यांनी व्यक्त केले .

पुरस्कार – सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ – शिवराज मंडळ , शिवाजी मित्र मंडळ
डॉ. बाबासाहेब जयंती उत्सव – भीमसेवा मंडळ , नवा मोदीखाना
सारनाथ बौध्द विहार , सोलापूर बाजार

वीर गोगादेव जन्मोत्सव – येरवडा निशाण आखाडा
साप्रंस निशाण आखाडा
ताजीया – बन्नू मुकादम ट्रस्ट , ताबूत स्ट्रीट ताजीया कमिटी
आदर्श कार्यकर्ता – कैलाशकुमार – गायक
आदर्श महिला सामाजिक कार्यकर्ती – गौसिया इनायत खान
आदर्श सामाजिक संस्था – वुई फॉर ऑल ट्रस्ट , गणेश पेठ
विशेष सन्मान – डॉ. डी. एन. यादव – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – मुख्य कार्यकारी अधिकारी
बापूसाहेब गानला – पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड – उपाध्यक्ष
हाजी कासम बियाबानी

पैगंबर जयंती – कॅम्प विभाग – प्रथम – बजमे उमरशाह बाबा फ्रेंड्स सर्कल , कॅम्प
व्दितीय – अल कुरेश यंग सर्कल , कॅम्प
तृतीय – नुरे इस्लाम यंग सर्कल , बाबाजानी चौक

शहर विभाग – प्रथम – शिवाजीनगर फ्रेंड्स सर्कल , शिवाजीनगर गावठाण
व्दितीय – गुलशन ए मदिना फ्रेंड्स सर्कल , येरवडा
तृतीय – लैब्बक यंग सर्कल , कोंढवा खुर्द