मराठा आरक्षण जाहीर करा व नंतरच ‘भरती’ प्रक्रियाकरा- विनोद पाटील
आज आर.आर.पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष व मराठाआरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठा आरक्षण जाहीरकरा व नंतरच भरती प्रक्रिया सुरू करा अशी मागणीकेली.
माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिनांक ०४ जुलै रोजीनागपूर येथे राज्यातील विविध विभागामध्ये महाभरतीकरण्याचे जाहीर केले. या निर्णयामुळे तमाम तरुणांनाशासकीय सेवेची संधी मिळत आहे त्याबद्दल विनोदपाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
परंतु अनेक वर्षांपासून वंचीत उपेक्षित मराठा तरुणांनाया भरतीमध्ये संधी मिळण्याकरिता तात्काळ मराठाआरक्षण जाहीर करावे अन्यथा आरक्षण मिळेपर्यंतसदरील भरती प्रक्रिया पुढे ढकलावी अशी मागणी केलीआहे.
अनेक वर्षांनंतर राज्यात मोठी भरती होत आहे, यामध्येराज्यातला मोठा घटक असलेला मराठा तरुण डावललागेला तर निश्चितच मोठी सामाजिक व आर्थिक दरीनिर्माण होईल. तरी आपण सर्व बाजूने आमचासहानभूतीपूर्वक विचार करावा व निर्णय घ्यावा असेपत्रात नमूद केले आहे.
