महावितरणमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 55 जनमित्रांचा गौरव

Share this News:

पुणे, दि. 03 : सन 2016-17 मध्ये उत्कृष्ट ग्राहकसेवा, वीजवाहिन्या व उपकेंद्गांची विनाअपघात तांत्रिक दुरुस्ती व देखभाल करणार्‍या 13 यंत्रचालक व 42 तांत्रिक कर्मचाऱ्यांना महावितरणच्या वतीने सोमवारी (ता. एक) गौरविण्यात आले.

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन रास्तापेठ येथील परिमंडल कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, सहाय्यक महाव्यवस्थापक श्री. धैर्यशील गायकवाड, कार्यकारी अभियंता सर्वश्री किशोर पाटील, प्रकाश खांडेकर, किशोर गोरडे यांच्याहस्ते प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह देऊन उत्कृष्ट 55 जनमित्रांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी पुढाकार घेतला.