राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहात 7 लाख पुणेकर होणार आगीपासून सुरक्षित

Share this News:
  • पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका संयुक्तरीत्या आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती करणार.
  • राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त हनीवेलच्या सेफ किड्स अ‍ॅट होम फायर सेफ्टी अभ्यासक्रमांतर्गत शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत मोहिम चालवली जाणार

पुणे, 12 एप्रिल, 2018: राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहानिमित्त पुणे महानगरपालिका (पीएमसी) आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांचे अग्नीशामक विभाग आणि जागतिक पातळीवर विना नफा तत्वावर चालवल्या जाणाऱ्या सेफ किड्स फाऊंडेशनने संयुक्तरीत्या शहरभरात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या सप्ताहांतर्गत हनीवेलच्यावतीने सेफ किड्स अ‍ॅट होम अभ्यासक्रमातील आगीपासून सुरक्षित राहण्याचे धडे दिले जातील.

सेफ किड्स अ‍ॅट होम हा 14 वर्षांखालील लहान मुलांबाबत घडणाऱ्या भाजण्याच्या घटना टाळण्यासाठी तयार करण्यात आलेला होम सेफ्टी कार्यक्रम आहे. हनीवेल होमटाऊन सोल्यूशन्स इंडिया फाऊंडेशनशी भागिदारीच्या माध्यमातून हा कार्यक्रम आखण्यात आला आहे. कंपनीच्या कॉर्पोरेट सिटीझनशिप उपक्रमांतर्गत या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. विस्तृत मार्केट रिसर्चच्या माध्यमातून पुण्यातील 4,25,000 विद्यार्थी आणि 2,50,000 पालकांपर्यंत कटिंग एज, प्रायोगिक आणि मजेदार शैक्षणिक उपकरणांच्या सहाय्याने आगीपासून सुरक्षित राहण्याच्या उपायांची माहिती पुरवण्यात आली आहे. आतापर्यंत या कार्यक्रमांतर्गत 300 मॉडेल फायर सेफ स्कूल्स आणि 100 फायर सेफ कम्युनिटीज तयार करण्यात आल्या आहेत. त्या ठिकाणी आगीच्या प्रसंगी घेण्याच्या आवश्यक त्या खबरदाऱ्यांची तरतूद करण्यात आली आहे.

या कार्यक्रमांबाबत माहिती देताना पुणे येथील अग्नीशामन विभागाचे मुख्य फायर ऑफिसर प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, ‘‘पुणेकर नागरिकांच्यात आगीपासून सुरक्षित राहण्याबाबत जागृती करुन त्यांना आगीच्या घटनांच्यावेळी खबरदारी बाळगण्यासाठी प्रशिक्षीत करण्यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न सुरु राहणार आहेत. आमचा विभाग नेहमीच आगीच्या प्रत्येक घटनेचा मुकाबला करण्यासाठी तसेच आणिबाणीच्या प्रसंगांसाठी सज्ज असतो. आपत्ती प्रतिबंधक उपायांच्यामुळे नेहमीच विकास आणि शाश्वततेची ग्वाही मिळत असते. यासाठीच गेल्या तीन वर्षांपासून आम्ही शहरातील नागरिकांच्यात आणि प्रामुख्याने मुलांना याबाबत विशेष जागृत बनवत आहोत.”

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य फायर ऑफिसरकिरण गावडे यांनी सांगितले की, ‘‘वेगाने होत असणारे नागरीकरण, आणि उद्योग तसेच नागरी वसाहतीत होत असणार्‍या प्लास्टीकच्या वाढत्या वापरामुळे आगीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरांना सुरक्षित आणि पर्यावरणाभिमुख बनवण्यासाठी ज्वलनशील वस्तुंचा वापर कमीत कमी करणे खूप महत्वाचे आहे.”

राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहांतर्गत दि. 14 ते 20 एप्रिल या कालावधीत रॅलीज, पथनाट्य, प्रदर्शने, आग सुरक्षाविषयक कार्यशाळा, मुलांसाठी कार्निवल्स, मॉल इवेंट्स, मॉडेल आणि पोस्टर मेकिंग स्पर्धा आदी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलले आहे.

यासोबतच सेफ किड्स फाऊंडेशन आणि अग्नीशामक विभाग यांच्याकडून शहरातील आगीच्या घटनांवेळी ती शमवण्यासाठी मदत करणार्‍या 150 अग्नी सुरक्षा मित्रांनाही विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

सेफ किड्स फाऊंडेशनचे कार्यक्रम संचालक डॉ. सिंथीया पिंटो यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात पुणेकर नागरिकांचा वाढता सहभाग ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. यावर्षीच्या उपक्रमांमधून 7,00,000 हून अधिक नागरिकांना लाभ होईल अशी अपेक्षा आहे. आमच्या सेफ किड्स अ‍ॅट होम कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्याबद्दल तसेच नागरिकांच्यात अग्नी सुरक्षेविषयी जागृती करण्याच्या मोहिमेत आम्हाला सहकार्य केल्याबद्दल पीएमसी आणि पीसीएमसी अग्नीशामक विभागाचे आम्ही आभार मानतो.”

हनीवेल इंडियाचे अध्यक्ष विकास चढ्ढा म्हणाले, ‘‘हनीवेलकडे अनेक दशकांचा फायर सेफ्टी अनुभव आहे. आमच्या जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानामुळे आणि स्थानिक पातळीवरील ज्ञानामुळे कुटुंबे आणि घरे सुरक्षित राहू शकत आहेत. सेफ किड्स अ‍ॅट होम कार्यक्रमाच्या पाठीशी राहिल्याचा आम्हाला अभिमान वाटत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून समुदायांचे सुरक्षिततेबाबत ज्ञान, वर्तन आणि स्वभाव बदलत आहे”

प्रत्येक वर्षी आयोजित केल्या जाणार्‍या राष्ट्रीय अग्नी सेवा सप्ताहाचा उद्देश कर्तव्य बजावत असताना प्राण गमवावे लागणार्‍या अग्नीशामक कर्मचार्‍यांना अभिवादन तसेच आगीपासून सुरक्षित राहण्याची जागरुकता निर्माण करणे हा असतो.

सेफ किड्स फाऊंडेशन 2006 मध्ये सेफ किड्स वर्ल्डवाईडचा सदस्य बनले आणि त्यांच्याच भागिदारीतून भारतातील लहान मुलांचे जीवन अधिक सुखकर बनवण्याचा प्रयत्न करीत आहे. सेफ किड्स फाऊंडेशन विना नफा संघटना, सरकार आणि शाळांसोबत काम करुन अपघातामुळे उद्भवणारे मृत्यू आणि दुखापतींविषयी जागृती करण्याचा प्रयत्न करते जे टाळता येणे शक्य आहे. सेफ किड्स फाउंडेशनने रस्ते सुरक्षे बाबत व्यापक आणि प्रशंसनीय कार्य केले आहे. फेडेक्सद्वारे प्रायोजित सुरक्षित मुले ‘या मार्गाने पायी चाला’ हा पादचारी सुरक्षा कार्यक्रम, मुंबईमध्ये 2007 मध्ये लहान मुलांसाठी चालताना होणाऱ्या जखमांना तोंड देण्यासाठी सुरु करण्यात आले. 2009 मध्ये दिल्ली आणि 2010 मध्ये अहमदाबाद या दोन अतिरिक्त शहरांमध्ये हा कार्यक्रम पुढे विस्तारला गेला आहे. 2007 ते 2016 पर्यंत, 3000 पेक्षा जास्त शाळा आणि जवळजवळ 4.5 दशलक्ष मुलांच्यापर्यंत पोहोचलेले शैक्षणिक उपक्रम, या शहरांतील मुलांसाठी रस्ते सुरक्षा सुधारण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावत आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये पुण्यात हनीवेल प्रायोजित ‘सेफ किड्स अॅट होम’ कार्यक्रम सुरु करण्यात आला, ज्यायोगे खासकरुन पुण्यातील मुलांना भाजण्याच्या धोक्यापासून सुरक्षित बनवण्याचा उद्देश होता. कार्यक्रमाचा संपूर्ण उद्देश आग आणि भाजण्यामुळे होणा-या जखमा कमी करणे आणि जीवघेण्या जखमा होण्यास प्रतिबंध करणे हे आहे. मार्च 2018 पर्यंत 425,000 मुले आणि 250,000 पालकांना या कार्यक्रमात समाविष्ट करून घेण्यात आले आहे