रेनो इंडियाकडून क्विडवर नव्याने वॉरंटी ऑफर – 4 वर्षे किंवा 1 लाख किमी

Share this News:

नवी दिल्ली रेनो हा भारतातील युरोपियन ऑटोमोटिव्ह ब्रॅण्ड असून त्यांनी त्यांच्या रेनो क्विड या आधुनिक चारचाकीवर रोड साईड असिस्टन्ससोबतच 4 वर्षे किंवा 1,00,000 किमीअशी अत्याधुनिक फर्स्ट वॉरंटी देत असल्याचे जाहीर केले आहे. यात 2 वर्षे किंवा 50 हजार किमीच्या स्टॅण्डर्ड वॉरंटीसह 2 वर्षे किंवा 50 हजार किमीच्या एक्सटेण्डेड वॉरंटीचा समावेश आहे. यातून रेनो क्विडच्या मूल्यवर्धनावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होत असून ग्राहकांना वहनमालकीचा विनादिक्कत अनुभव यावा यासाठी या खास ऑफर देण्यात येत आहेत.

रेनो क्विड ही चारचाकी आधुनिक चारचाकींच्या बाजारपेठेतल गेम-चेंजर बनली असून रेनो इंडियाच्या व्यापारवृद्धीतही या गाडीचा मोलाचा वाटा आहे. सुरू झाल्यापासून रेनोची आजवर 2.2 लाख वाहनांची विक्री झाली आहे. सर्वांसाठी दळणवळण सहजसाध्यकरण्याच्या रेनोच्या धोरणात्मक वैशिष्ट्यावर रेनो क्विडच्या सादरीकरणामुळे शिक्कामोर्तब झाला असूनआंतरराष्ट्रीय वृद्धी धोरणालाही यामुळे चालना मिळाली. 0.8 एल, 1.0 एल एमटी, 1.0 एल एएमटी आणि क्लायम्बर इतकी मोठी रेंज असलेल्या रेनो क्विड या ब्रॅण्डमुळे जागतिक संशोधनाच्या विश्वात शाश्वत कामगिरी करून लाईफसायकल प्लानमधील उत्पादनाच्या माध्यमातून स्थानिकांच्या गरजा भागवण्याच्या रेनोच्या उद्दिष्टाचेही स्पष्टीकरण झाले आहे.

याहीपुढे जाऊन, रेनो इंडिया या कंपनीने रेनो सिक्युअरउपक्रमांतर्गत (वाढीव वाहन वॉरंटी आणि रोड साईड असिस्टन्स) आकर्षक ऑफर्स सादर केल्या आहेत. ग्राहक आता वाढीव वॉरंटी 5 वर्षांपर्यंत व 1 लाख किमीपर्यंत (आधी जे साध्य होईल ते) वाढवून घेऊ शकणार असून यासोबतच कॅप्चर, क्विड, डस्टर आणि लॉजी या रेनो इंडिया चारचाकींवर रोड साईड असिस्टन्स देण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांत, भारतात मजबूत व्यापार स्थापन करण्यावर रेनोचा भर दिसून येतो. मजबूत अशा क्विडच्या उत्पादनाभिमुख धोरणासह नुकत्याच सादर करण्यात आलेल्या एसयूव्ही, कॅप्चरच्या मदतीने उत्पादन, नेटवर्क व्याप्ती, ग्राहकाभिमुख उपक्रम आणि अनेक कल्पक विपणन उपक्रमांतून ग्राहक समाधान संपादन करून रेनो सर्वांगीण धोरणविकास करीत असल्याचेही जाणवते आहे.

आपल्या ग्राहकांना विनादिक्कत ब्रॅण्ड मालकीचा अनुभव देण्यासाठी रेनो इंडियातर्फे अनेक अत्याधुनिक विक्रीपश्चात उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. यात रेनो सिक्युअर, रेनो असिस्ट, वर्कशॉप ऑन व्हिल्स(डब्ल्यूओडब्ल्यू), पॅशन ऑन व्हिल्स (पीओडब्ल्यू),कस्टमर ऍप्स आणि नियमित ग्राहकसेवा शिबीरेआदी उपक्रमांचा समावेश होतो. भारतकेंद्री मजबूत उत्पादन धोरणासह, सतत बदलत राहणाऱ्या ग्राहकनिवडीशी जुळवून घेण्यासाठी रेनोने आधुनिक योजना आखल्या असून भारतीय बाजारपेठेशी दीर्घकालीन नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी नवीन ग्राहकांनाही हसतमुखाने रेनो कुटुंबात समाविष्ट करून घेण्यात येते.