संग्राम तावडे यांचा सेवादल अध्यक्षपदाचा राजीनामा

पिंपरी (दि. 9 मे 2018) पिंपरी चिंचवड सेवादलाचे शहराध्यक्ष संग्राम तावडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक लालजीभाई देसाई यांच्याकडे दिला आहे. तावडे यांची मागील दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कार्यकारीणी कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली होती. संघटनेत नवीन कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून तावडे यांनी हा राजीनामा दिला. तावडे यांनी नियुक्ती 2009 साली झाली होती. 2010 साली ऑल इंडिया कॉंग्रेस कमिटीच्या दिल्ली येथे झालेल्या 125 व्या राष्ट्रीय अधिवेशनात सहभागी होण्याची संधी मिळाली होती.