सुपरकिड शिवा ‘शिवा ॲण्ड द लॉस्ट ट्राइब’ या आगामी सिनेमात आणखी एका साहसासाठी सज्ज
यंदाच्या सुट्टीच्या हंगामामध्ये लहान मुलांना त्यांच्यालाडक्या सुपरकिड शिवासोबत खास समरअडव्हेन्चरचा अनुभव मिळणार आहे. पहिल्याटेलिव्हिजन चित्रपटाला मिळलेल्या भव्य यशानंतरसुपरकिड शिवा आणखी एक हृदयस्पर्शी, मनाला वेडलावणारा व थरारक चित्रपट ‘शिवा ॲण्ड द लॉस्ट ट्राइब‘घेऊन आला आहे. हा चित्रपट बाल प्रेक्षकांना भारावूनटाकेल. एक अस्सल हिरो आपले अद्वितीय कौशल्य,बुद्धिमत्ता व क्षमतांसोबतच त्याच्या मित्रांची टोळी वत्याच्या सुपर बाइकसह या मिशनला सुरुवात करत आहे.
साहसाची आवड असलेल्या शिवाने भारत दौरा करतत्याचा आगामी चित्रपट ‘शिवा अण्ड द लास्ट ट्राइब‘चेप्रमोशन केले आणि लहान प्रेक्षकांची भेट घेतली. काहीभाग्यवान लहान मुलांना त्यांच्या आवडत्या कार्टून्सचीभेट घेण्याची संधी मिळण्यासोबतच मिस्ट्री रूम्सनेआयोजित केलेल्या स्केव्हेन्जर हंट येथे त्याच्या आगामीचित्रपटाची झलक देखील पाहायला मिळाली. सुपरकिडशिवा पुण्यातील मिस्ट्री रुममध्ये असताना मुलांनालपवलेला खजिना शोधण्यामध्ये मदत करत होता.लहान मुलांना शिवाला भेटून खूप आनंद झाला. त्यांनीहुडुडु ट्राइबप्रमाणे पोशाख परिधान करत त्यांच्याआवडत्या कार्टून्ससोबत फोटो देखील काढले.
तर मग छोट्या दोस्तांनो, रविवार सकाळचा वेळमोकळा ठेवा आणि पहा सुपरकिड शिवाचा अद्वितीयप्रवास ३ जून २०१८ रोजी सकाळी ११.३० वाजतानिकलोडिअनवर.
