अभाविपने केले फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

Share this News:
स्वायत्ततापूर्ण अश्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थानिक शाखेने महाविद्यालयातील विविध समस्येविरुद्ध आंदोलन केले. तसेच आज महाविद्यालय प्रशासनाने अभाविप चे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये असणाऱ्या प्रत्येक विभागात पिण्याची पाण्याची सोय असावी, पार्किंगचे व्यवस्थापन करावे आणि पार्किंग शुल्क पुर्णपणे बंद करावे. ह्या मागण्यांसह WiFi युक्त कॅम्पस, महाविद्यालयात स्वच्छतेसाठी कचरापेटीची व्यवस्था करावी, तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ब्रेल प्रिंटर उपलब्ध करून देण्यात यावे, जिमखाना वेळापत्रक आणि नवीन साधने जिमखान्यात उपलब्ध करून देण्यात यावी, महाविद्यालय परिसरात १० हजार विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांसाठी अतिरिक्त शौचालये उपलब्ध नाहीत ती उपलब्ध करावी,अस्वच्ह असलेल्या कॉलेज कॅन्टीन, महाविद्यालायातील विद्यार्थ्यांची सुरक्षा असावी. तसेच प्रवेश घेण्यासाठी वापरली जाणारी त्रासदायक ERP प्रणाली पुर्णपणे बंद करावी अश्या विविध १३ मागण्यांसाठी अभाविप फर्ग्युसन शाखेने कॉलेज प्रशासनाविरुद्ध तीव्र स्वरुपात आंदोलन केले.
आंदोलनाच्या वेळी महाविद्यालयातील २०० विद्यार्थी यावेळी सहभागी होते. तसेच फर्ग्युसन महाविद्यालात आंदोलन करीत असतांना प्रशासन त्याची कुठलीही दखल घेत नसल्यामुळे अभाविपने तीव्र स्वरुपात DES सोसायटीच्या कार्यालयात ह्यासाठी 'ठिय्या आंदोलन' केले. ह्यावेळेस आंदोलनाची तीव्रता पाहून फर्ग्युसन महाविद्यालय प्रशासनाने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला.
यावेळी पुणे महानगर मंत्री प्रदीप गावडे, महानगर सहमंत्री सागर काळे, मध्य पुणे भाग मंत्री परिमल देशपांडे, कोथरूड भाग मंत्री अक्षय बिक्कड, महानगर प्रसिद्धी प्रमुख अद्वैत पत्की आणि कार्यकर्ता योगेश्वर राजपुरोहित यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.