आईसाहेब प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Share this News:

आईसाहेब प्रतिष्ठान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खास महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम घेण्यात आला . या कार्यक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांच्याहस्ते पार पडला . यावेळी अध्यक्षस्थानी संगीता घुले ,कार्यक्रमाचे आयोजक आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक  लक्ष्मण भोसले संजय टकले,मांजरीचे पोलीस पाटील शिवाजी घुले जिल्हा परिषद सदस्य दिलीप घुले शिवाजी खलसे ,संदेश शिंदे शिवराम कांबळे खरात गुरुजी ,पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे   आदी मान्यवर उपस्थित होते . यावेळी गरजू होतकरू विद्यार्थ्यांना ११ सायकलींचे  वाटप ,  शालेय गणवेश व साहित्य वाटप २० विधवा मातांना साडी चोळी जेष्ठ नागरिकांना पोशाख ,महिलांना भेट वस्तू वाटप करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देण्यात आले . यामध्ये पोलीस निरीक्षक मनिषा झेंडे यांना मांजरी भूषण पुरस्कार कैलासराव सोनवणे याना भीमरत्न पुरस्कार आयुब मोमीन यांना शिवरत्न पुरस्कार डॉ. तानाजी हंबीर याना आदर्श डॉक्टर अनंत टी. पाटील याना आदर्श शिक्षक पुरस्कार अजित वाडेकर याना उद्योगरत्न पुरस्कार अजय चव्हाण याना क्रीडारत्न पुरस्कार आदींना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले .

आईसाहेब प्रतिष्ठानचे पदाधिकारी बाळासाहेब भोसले रोहिदास पवार सुमित भोसले ,बिपीन भोसले गणेश गायकवाड गौतम भोसले निलेश कांबळे अविनाश वाघमारे ,अमित भोसले आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले . यावेळी आईसाहेब प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले . आईसाहेब प्रतिष्ठानचे संस्थापक लक्ष्मण भोसले यांच्या परिवाराच्यावतीने सामाजिक कार्यासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण भोसले यांनी केले तर आभार आईसाहेब प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी मानले .