इलेक्ट्रिक ए सी बस दीर्घकालीन फायद्याची – एम पी एम एल संचालक सिद्धार्थ शिरोळे
दि २१ जुलै २०१८
डिझेल एसी बस पेक्षा इलेक्ट्रिक एसी बस ह्या शहर प्रवासी वाहतुकीसाठी आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या असून ह्या संबंधी सर्व संबधित तज्ज्ञांशी चर्चा करूनच ह्या बसेस पुणेकरांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे प्रतिपादन पी एम पी एम एल चे संचालक नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे ह्यांनी केले आहे. इलेक्ट्रिक एसी बसचा प्रत्येक किलोमीटर साठी एकूण खर्च साधारण ७-८ रुपये एवढा आहे तर डिझेल साठी प्रति किलोमीटर खर्च हा १९ ते २० रुपये एवढा असून ह्या दोन्ही प्रकारात फक्त ए सी सुविधेसाठीचा इलेक्ट्रिक गाड्यातील खर्च प्रति किलोमीटर ३० ते ४० पैसे असून हाच खर्च डिझेल साठी ७ ते ८ रुपये इतका जास्त आहे. त्याचप्रमाणे कॉम्प्रेसर तंत्रज्ञान असल्याने डिझेल मुळे होणारे अन्य खर्च जसे की मेंटेनन्स, प्रदूषण तसेच इलेक्ट्रिक बस द्वारे प्रवाश्यांना उपलब्ध होणारा आराम ह्या गोष्टी लक्षात घेता मोटर तंत्रज्ञान असणाऱ्या इलेक्ट्रिक एसी बसेस चा वापर हा अधिक सुलभ तसेच पी एम पी एम एल साठी दीर्घकालीन फायद्याचा ठरणार असल्याचे शिरोळे ह्या वेळी बोलताना म्हणाले. तसेच ह्या संबंधि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्याशी देखील चर्चा झाली असून त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ही प्रक्रिया सूरू असल्याचे देखील शिरोळे ह्यांनी निदर्शनास आणले आहे.
