कँम्प भागातील वीज दुरुस्ती व्हँन सेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी
पुणे कँम्प: गेली काही महिन्यांपासून वाडीया उपविभागातील वीज दुरूस्ती व्हँन सेवा काही कारणास्तव महावितरण कंपनी तर्फे बंद करण्यात आली आहे. कँम्प भागात अद्यापही ७०% हून अधिक ओव्हरहेड वायरिंग आहे त्यामुळे वीज दुरुस्ती करण्यात कर्मचाऱ्यांना अडचणी येतात व विलंब होत असुन नागरिकांना त्याचा नाहक त्रास होत आहे तसेच वीजेमुळे एखादी दुर्घटना घडल्यास धोका निर्माण होऊ शकतो याकरीता कँम्प भागात वीज दुरुस्ती व्हँन सेवा पूर्ववत सुरु करावी अशी मागणी कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे व पुणे कँन्टो.बोर्डाचे सदस्य दिलीप गिरमकर यांनी बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
