चिमुकल्यांनी केल्या राजबागे विषयी तक्रारी -मुलांच्या धीटपणाचे कौतुक.

Share this News:

चिमुकल्यांनी केल्या राजबागे विषयी तक्रारी -मुलांच्या धीटपणाचे कौतुक…
८ दिवसात श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि राजबागेतील त्रुटी दूर करणार – उद्यान अधीक्षक अशोक घोरपड्यांचे मुलांना वचन…
——————————————————————————————————————
काका आम्हाला खेळताना हे दगड पायाला लागतात पार्थ गावडे हे सांगत असतानाच शमिका साठे कचऱ्या विषयी तक्रार करते तर ईश्वरी फाले झाडाभोवतीचा तुटका पार आणि कठड्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधते,तेवढ्यात दर्शन चरवाड,संकेत जाधव,साई जाधव कोपऱ्यातील दारूच्या बाटल्या आणि तेथे पडलेले बांधकाम साहित्य दाखवतात,तर प्राप्ती महाडिक बागेला गेट करा अशी मागणी करते …. निमित्त होते भाजप चे पुणे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी पटवर्धन बागेतील कै श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान आणि गणेशनगर मधील राजबाग या ठिकाणच्या दुरवस्थेची पाहणीसाठी उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांच्या भेटीचे आयोजन केले होते.यावेळी नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे,सुधीर फाटक,श्रीकृष्ण गोगावले,प्रमिलाताई फाले,सौ मधुरा नलावडे,मंजू फाले, आणि बाळ विकास केंद्राच्या शीतल बोरकर उपस्थित होते. श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील कारंजे डेंग्यू मुळे बंद ठेवले आहे मात्र त्याची आवश्यक डागडुजी करून ते लगेच सुरु करू,तसेच येथील नक्षत्र उद्यानात वृक्षांच्या माहितीचे फलक लावू व ओपन जिम चे काम त्वरित पूर्ण करू असे घोरपडे साहिबांनी स्पष्ट केले.राजबागेची पाहणी करायला गेल्यावर तेथे रोज खेळणारी चाळीस मुळे गोळा झाली आणि त्यांनी तक्रारींचा पाढाच वाचला.या चिमुकल्यांच्या धीटपणाने केलेल्या तक्रारी ऐकून सर्वच उपस्थित्यांनी मुलांचे कौतुक करतानाच ८ दिवसात या बागेची दुरावस्था दूर करण्याचे वचन दिले व घोरपडे साहेबांनी मुलांसमोरच उद्यान च्या कर्मचाऱ्यांना गुरुवार पर्यंत काम करण्याच्या सूचना दिल्या.जात जात मुलांनी काकांना विनवणी केली कि ” येथे एक रखवालदार ठेवा,आणि मोठी माणसे येथे दारू पीत बसतात व कचरा टाकतात,त्यांना आवरा” यावर ही घोरपडे साहेबांनी कार्यवाही च्या सूचना दिल्या.
लहान मुलांनी ज्या धीटपणे त्यांच्या समस्या मांडल्या त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे संदीप खर्डेकर म्हणाले.भावी पिढी च निद्रिस्त प्रशासनाकडून कामे करवून घेईल याची जाणीव ठेवून स्वतःचे कर्तव्य पार पाडले पाहिजे व छोट्या छोट्या गोष्टीसाठी नागरिकांना चक्र मारत तक्रार करण्याची वेळ येत काम नये असेही खर्डेकर म्हणाले.येत्या ८ दिवसात येथील कामे पूर्ण झाली नाहीत तर आंदोलन उभारू असे शिक्षण मंडळ सदस्य सौ मंजुश्री खर्डेकर यांनी स्पष्ट केले.