छत्री रंगकाम कार्यशाळेत रंगले पुणेकर
पुणे :
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत छत्री रंगकाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते .
शुभा रुद्र (जी.डी.आर्ट, ए.एम.),
अस्मिता वेदपाठक, शिल्पा मोहिते (परांजपे विद्यामंदीर कोथरूड च्या चित्रकला शिक्षिका), वामन लेले ( चित्रकला शिक्षक,सुलोचना नातू विद्या मंदीर, शिवाजीनगर ) यांनी संयोजन केले. कार्यशाळा सर्वांसाठी खुली होती .
रविवारी सायंकाळी भारतीय विद्या भवन, परांजपे विद्या संकुल (कोथरूड )येथे ही कार्यशाळा झाली . भारतीय विद्या भवनचे मानद सचिव नंदकुमार काकिर्डे यांनी स्वागत केले
आपल्या आवडीच्या पॅटर्न मध्ये छत्री रंगविण्यात आबालवृद्ध पुणेकर दंग होऊन गेले .
विविध वयोगटातील ५० जणांनी कार्यशाळेत सहभाग घेतला. ‘ पंढरीचा राजा ‘, फुलपाखरे, मासोळ्या, माऊली, वारली चित्रकला अशा अनेक संकल्पना या कलाकारांनी छत्र्यांवर साकार केल्या.
