झूमकारकडून झॅप सबस्क्राइबला पुण्यात प्रारंभ
झूमकार या भारतातील पहिल्या सेल्फ ड्राइव्ह मोबिलिटी प्लॅटफॉर्मने आज पुण्यात झॅप या त्यांच्या मालकीच्या फ्रॅक्शनल शेअरिंग प्रोग्रामअंतर्गत एक नवीन क्रांतीकारक सबस्क्रिप्शन मॉडेल आणले आहे. झॅप सबस्क्राइब हा विद्यमान झॅप प्रोग्रामचा विस्तार असून त्यामुळे व्यक्तींना नवीन किंवा जुन्या गाड्या एका निश्चित मासिक शुल्कावर सबस्क्राइब करणे शक्य होते. या सबस्क्रिप्शन मॉडेलमुळे व्यक्तींना अधिक लवचिकता आणि सोय मिळेल आणि त्याचवेळी वाहन खरेदी करणे सहजशक्य होईल.
झॅप सबस्क्राइबसोबत ग्राहक महिन्याला फक्त 18,999 रूपये आणि त्याहून अधिक किमतीत कार सबस्क्राइब करू शकतात. झूमकारवर हे शुल्क इतर वापरकर्त्यांसोबत शेअर करून आपण त्यात बचतही करू शकतो. झॅप सबस्क्राइबमध्ये 6, 12, 18 आणि 24 महिन्यांचे लवचिक कालावधी येतात. या कालावधींमुळे खूप चांगली सोय होते कारण ते ग्राहकाच्या गरजांनुरूप लवचिक आहेत. झूमकारकडून 15 फेब्रुवारी 2018 रोजी आपल्या पहिल्या प्री सेलचे आयोजन दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, बंगळुरू आणि हैदराबाद येथे करता येईल जेथे ग्राहक फक्त 999 रूपयांमध्ये कार प्री बुक करू शकतात आणि उपलब्ध असलेली एक नवी कोरी लिमिटेड बॅच कार राखून ठेवू शकतात. आपल्याला प्री बुकिंग रकमेवर 100 टक्के रिफंड आणि 1000 झूमकार ड्रायव्हिंग व्रेडिट प्रत्येक यशस्वी शिफारशीनंतर मिळू शकतात. ग्राहक येथे नोंदणी करू शकतात- https://www.zoomcar.com/zap/subscribe
याबाबत बोलताना झूमकारचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक ग्रेग मोरान म्हणाले, यझॅप सबस्क्राइबसोबत झूमकार भारतातील पहिलेवहिले कार सबस्क्रिप्शन मॉडेल आणत आहे. मागील अनेक वर्षांमध्ये भारतात मोठ्या प्रमाणावर विचारसरणीतील बदल दिसून येत असून मालकीपेक्षा गाडी मिळण्यास जास्त महत्त्व दिले जाते. झॅप सबस्क्राइब या विचारसरणीला प्रोत्साहन देत असून वैयक्तिक वाहन मिळण्याचा खर्च अत्यंत कमी करून शेअर्ड इकॉनॉमीला चालना देत आहेत. सबस्क्राइबमागील आमचे प्राथमिक उद्दिष्ट हे तंत्रज्ञान आणि माहिती विज्ञानाला चालना देऊन सबस्क्रायबरसाठी सर्व अडथळे दूर करण्याचे आहे.
झॅप सबस्क्रिप्शन मॉडेलची प्रमुख वैशिष्टेः
· शून्य डाऊनपेमेंटः झॅप सबस्क्राइबमुळे हेही अडथळे दूर होतात कारण तुम्हाला खूप जास्त डाऊनपेमेंट भरायची गरज पडत नाही. तुमच्या आवडीची कार मासिक फक्त 18,999 रूपयांमध्ये मिळवा.
· तुमची वैयक्तिक कार मिळवा फक्त 48 तासांत- झॅप सबस्क्राइबसोबत तुम्हाला सहजपणे कार मिळू शकेल. तुमची कार पेमेंट केल्यावर अवघ्या 48 तासांत उपलब्ध होईल.
· देखभाल नाही- झॅप सबस्क्राइबसोबत तुम्हाला तुमची कार रस्त्यावर आणण्यासाठी जास्तीची रक्कम भरावी लागत नाही. देखभालीचा खर्च तुमच्या मासिक सबस्क्रिप्शन शुल्कात समाविष्ट आहे.
· मर्यादित नुकसानाची जबाबदारी- अपघात झाल्यास, झॅब सबस्क्राइमध्यश वैयक्तिक कमाल जबाबदारी फक्त 10000 रूपये आहे. ती सर्वसाधारण व्हाइट बोर्ड कार विम्याच्या तुलनेत खूप कमी आहे.
· तुम्हाला हवे तेव्हा नवीन कार खरेदी करण्याची लवचिकता- झॅप सबस्क्राइब तुम्हाला लवचिकता देते आणि तुम्हाला 6, 12, 18, 24 महिन्यांच्या कालावधीमधून निवड करता येते.
· अमर्यादित किलोमीटर- तुम्ही झॅप सबस्क्राइबवर वाहन चालवत असताना किलोमीटरवर कोणतेही निर्बंध नाहीत.
