डॉ. आंबेडकरांच्या मार्गदर्शक तत्वांचे आचरण करावे… खासदार अमर साबळे

पिंपरी , पुणे (दि. 24 एप्रिल 2018) युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचे प्रत्यक्ष आचरण करावे. बाबासाहेबांनी भारतीय संविधानाची रचना केली. यामध्ये ‘सर्वधर्म समभाव’ हा केंद्रबिदू मानून भारतीय घटना तयार करण्यात आली. समाजातील शेवटच्या स्तरातील माणूस जो पर्यंत सक्षम होत नाही; तो पर्यंत संपूर्ण समाज पुढे जाऊ शकणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सरकार ‘सबका साथ सबका विकास’ हे ध्येय घेऊन गोरगरीब दीन-दलित, आदिवासी, आर्थिक दुर्बलांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कटीबध्द आहे. भविष्यात निवडणूका होणार आहेत. सर्वसामान्यांना मतदानाचा पवित्र अधिकार असून त्याव्दारे देशाचा राजा म्हणजेच पंतप्रधान ठरविण्याचे पवित्र कार्य नागरिकांनी करावे, असे प्रतिपादन खासदार अमर साबळे यांनी केले. यावेळी उद्योजक आणि अचिव्ह हायड्रोलिक्स ॲण्ड प्युनेमेटिक्स लि.चे संचालक राजेंद्र सोनवणे यांचा ‘बहुजन भूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील बहुजन प्रतिष्ठाण प्रणित बहुजन संघर्ष प्रतिष्ठाणच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात खासदार साबळे बोलत होते. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मनोज तोरडमल, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, नगरसेवक माऊली थोरात, नामदेव ढाके, बाबू नायर, बाबासाहेब त्रिभूवन, बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका करुणा चिंचवडे, अनिता सोनवणे तसेच निता परदेशी, बहुजन प्रतिष्ठानचे बध्दीसागर आठवले, दादा गणगे, गणेश क्षीरसागर, शेषराव लोमटे, राहुल जगताप, कल्याण शिंदे, शेखर चिंचवडे, संजय मंगोडेकर, सलिम शिकलगार, सचिन शिवले, निलेश भोंडवे, बिभिषण चौधरी, हेमंत ननावरे, सचिन चिंचवडे, श्रीनिवास सोनवणे, श्रीकांत वाघमारे, सचिन वाघमारे, दीपक तोरडमल, सुनील सोनवणे, राम कसबे, विद्या जाधव, स्वप्निल बनसोडे, महावीर जगताप, प्रदीप कसबे, मारूती सोनटक्के, बाबासाहेब पालके, सलमान शेख, विजय दणगे, गौतम गायकवाड, पप्पु आडागळे, सतिष भवाळ, सनी घावरी, सारंग वाघमारे, बालाजी पतंगे, अंकुश तेलंग आदी उपस्थित होते. यावेळी स्वर सम्राट प्रल्हाद शिंदे यांचे नातु पार्श्वगायक समर्थक दिनकर शिंदे यांचा भिमबाणा हा संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज तोरडमल यांनी केले. सुत्रसंचालन शुभांगी शिंदे यांनी तर आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले. कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
