तरुणांसाठी नाट्य कार्यशाळेचे आयोजन
पुणे, दि. २७ जून : नाट्यसंस्कार कला अकादमीच्या वतीने तरुणांसाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. १६ वर्षावरील मुलांना अभिनय, दिग्दर्शन, लेखन, रंगमंच व्यवस्थापनाबरोबरच तांत्रिक बाजूंचे देखील प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. १ जुलै ते २६ ऑगस्टदरम्यानच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार हि कार्यशाळा असणार आहे. कार्यशाळेचा समारोप सहभागी कलाकारांच्या नाट्यप्रयोग सादरीकरणाने होणार असल्याची माहिती नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी दिली आहे.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी (धनंजय कुलकर्णी : ७५८८२३५८२५) तसेच (www.natyasanskar.com) या वेबसाईटवर संपर्क साधण्याचे आवाहन पारखी यांनी केले आहे.
लहानपणीच मुलांमध्ये नाट्यशास्त्र रुजावे,कळावे यासाठी नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके काम करत आहे. “भालबा केळकर करंडक”, “दिवाकर स्मृती नाट्यछटा” अशा बालनाट्यविश्वातील प्रतिष्ठीत समजल्या जाणा-या स्पर्धांचे आयोजन नाट्यसंस्कार कला अकादमी गेली अनेक दशके करत आहे. प्रशिक्षण, प्रयोग आणि प्रकाशन याबरोबर नाट्यसंस्कार कला अकादमी नाट्य प्रशिक्षण शिबिर घेत असते.
कार्यशाळा कालावधी : १ जुलै ते २६ ऑगस्ट २०१८ (प्रत्येक शनिवार आणि रविवार)
वयोगट: १६ वर्षांपासून पुढे
