ताल-संवाद संस्थेचे उदघाटन
* पं.शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाची होणार मैफल
पुणे,23 मार्च 2018 : प्रसिध्द तबला वादक सुभाष कामत यांच्या ताल-संवाद या तबला वादन (प्रशिक्षण) संस्थेचा शुभारंभ आणि आधुनिक काळातील टेक्नो जगाशी संवाद साधणार्या वेबसाईटच्या उदघाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.हा उदघाटन समारंभ रविवार,1 एप्रिल 2018 रोजी सायंकाळी 6 वाजता अभिनव विद्यालय,इंग्रजी मिडियम प्राथमिक शाळा कर्नाटक शाळेसमोर,एरंडवणे येथे होणार आहे. यादरम्यान लोकप्रिय शास्त्रीय गायक पं.शौनक अभिषेकी यांच्या सुश्राव्य गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असणार आहे.
