थिसेनक्रपतर्फे पुण्यात `वी सायकल अँड वी वॉक’चे आयोजन

Share this News:

पुणे,

0

5 फेब्रुवारी, 2018 : आरोग्य, सुरक्षितता आणि शाश्वतता हे प्रमुख घटक म्हणजे थिसेनक्रपचे कॉर्पोरेट धोरण आहे. शुक्रवारी, थिसेनक्रपचे तब्बल 700 कर्मचारी, `वी सायकल अँड वी वॉक या उपक्रमाचा भाग म्हणून पुण्यात सायकल चालवत आणि चालवत ऑफिसला गेले, पर्यावरणाच्या संरक्षणाबाबत जागरुकता पसरवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला होता.

300 कर्मचारी 12 किलोमीटरपर्यंत सायकल चालवत आणि 400 कर्मचारी तीन किलोमीटरपर्यंत चालत ऑफिसला गेले, यामध्ये थिसेनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री. मलाय दास आणि थिसेनक्रप इंडस्ट्रीज इंडियाचे सीएफओ श्री. जी. व्ही. केतकर यांचाही समावेश होता.

कंपनीच्या आवारात कार किंवा बाईक्सना प्रवेश नव्हता आणि कर्मचाऱ्यांना सायकल किंवा सार्वजनिक वाहनांनी ऑफिसला ये-जा करायची होती; सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनही पूर्ण दिवसासाठी बंद ठेवण्यात आले होते.

थिसेनक्रपच्या शाश्वत प्रयत्नांसाठी पर्यावरणीय संरक्षण हा प्रमुख घटक आहे. ऑफिसपर्यंत चालत येणे हे आरोग्यासाठी चांगले आहेच, शिवाय आपले जीवनमानही सुधारते, आणि याव्यतिरिक्तचा सर्वात मोठा फायदा म्हणजे कार्बनचे उत्सर्जन कमी झाल्याने, पर्यावरणाला याचा लाभ होतो, असे थिसेनक्रप इंडस्ट्रिज इंडियाचे एमडी आणि सीईओ श्री. मलाय दास म्हणाले.

प्रदूषण आणि पर्यावरणाचा वाढता धोका हा समकालीन सिनारिओतील प्रमुख घटक आहे. स्वच्छ आणि निरोगी पर्यावरणाच्या खात्रीसाठी महत्त्वाची पाऊले टाकण्यात आली आहेत.