देशव्यापी ओबीसी जात निहाय जनगणना अभियान संविधानिक न्याय रथ यात्रेस पुणे येथून सुरुवात
ओबीसी समाज आज पण मुख्य प्रवाहापासून खुपच दूर आहे.या अनुषंगाने ओबीसी समाज आपल्या विविध मागण्या घेवून संविधानिक न्याय रथ यात्रा दिनांक 11/04/2018 रोजी समताभूमि (फुलेवाडा) महात्मा फुले पेठ-पुणे येथून सुरवात होवून संपूर्ण महाराष्ट्र भर हा रथ यात्रा फिरुन दिनांक 11/05/2018 रोजी चैतन्यभूमि दादर मुंबई येथे संपणार आहे.ओबीसी समाजाच्या विविध मागण्या घेवून हा सांविधानिक रथ यात्रा निघाला आहे,तरी ओबीसी बांधवानो या संविधानिक रथ यात्रे मध्ये सहभागी होवून आपले अनमोल मार्गदर्शन करावे हिच अपेक्षा …!
सदर सांविधानिक न्याय रथ यात्रा प्रारंभाच्या वेळी माजी खासदार तथा विद्द्यमान आमदार माननीय हरिभाऊ राठोड साहेब, माननीय आमदार बळीरामजी शिरस्कार साहेब,ओबीसीचे नेते माननीय जयंतीभाई मनानी साहेब,ओबीसीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय डॉ ज्ञानेश्वर गोरे साहेब,एसीपी व्ही.टी.पवार साहेब,ओबीसीचे नेते डॉ पी बी कुंभार सर,ओबीसीच्या नेत्या सुशीला मोराळे ताई इत्यादी अनेक मान्यवर व ओबीसीचे असंख्य बांधव उपस्थित होते..!
