पुणे प्रतिनिधी, विशाल मुंदडा – नटराज मित्र मंडळातर्फे गणेशोत्सव २०१७ या वर्षात “माणुसकीचा बॉक्स” अशी संकल्पना राबवण्यात आली. यात जुने पण सुस्थितीत असलेले कपडे मंडळामध्ये आणण्यास आवाहन केले होते. या उपक्रमातून जमा झालेले कपडे बुधवार, दि. १३ डिसेंबर २०१७ रोजी डिंभे व आमडे ता.आंबेगाव, जि. पुणे येथील डिंभे धरणाला लागुन राहत असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये वाटण्यात आले. ४० कुटुंबांना कपडे वाटपाचा फायदा झाला.
यावेळी नागरिकांना थंडीचे गरम कपडे, ब्लॅंकेटस, शर्ट, टी-शर्ट, जीन्स, कुर्ती, साड्या, लहान मुलांचे कपडे इ. प्रकारचे वस्त्र वाटण्यात आले.
बी. डी. काळे महाविद्यालय घोडेगाव, ता. आंबेगाव जि. पुणे येथील महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थी यांनी या उपक्रमाचे ध्येय व उद्देश याबाबत माहिती दिली. प्राचार्यांच्या अनुमतीने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना सोबत घेऊन हा उपक्रम संपन्न झाला. या उपक्रमासाठी मंडळाचे कार्यकर्ते व बी. डी. काळे महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.