‘प्लास्टिकबंदी आणि कारवाई ‘ विषयावर २ जुलै रोजी महाचर्चा

WhatsApp-Image-2018-06-29-at-9.15.05-PM.jpeg
Share this News:
पुणे :
पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘ प्लास्टिकबंदी आणि कारवाई ‘ विषयावर २ जुलै रोजी महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे.
पुणे श्रमिक पत्रकार संघ सभागृह येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत २ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ही महाचर्चा होईल, अशी माहिती पुणे महानगर परिषदेचे अध्यक्ष अॅड. गणेश सातपुते यांनी पत्रकाद्वारे दिली.
या महाचर्चेत आमदार नीलम गोऱ्हे, आमदार विजय काळे, ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, अॅड. असीम सरोदे, मनसेचे शहराध्यक्ष अजय शिंदे, प्रदुषण नियामक मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे, पालिकेचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सह आयुक्त सुरेश जगताप,स्टेशनरी -कटलरी असोसिएशनचे दिलीप कुंभोजकर, हॉटेल असोसिएशनचे जवाहर चोरगे, प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे नितीन पटवा, रिटेल व्यापारी असोसिएशनचे सचिन निवंगुणे सहभागी होणार आहेत.
महाचर्चेला उपस्थित राहण्याचे आवाहन अॅड. गणेश सातपुते, महेश महाले, संतोष पाटील, किरण बराटे,योगेश खैरे , केदार कोडोलीकर, संजय दिवेकर , अनिरुद्ध खांडेकर, दत्तात्रय जगताप, राजेश तोंडे यांनी आवाहन केले आहे.