भविष्यातील सकारात्मक विचारांमुळे रिअल्टी बाजारपेठेत पुनरूज्जीवनाची चिन्हे
– अधीच्या तिमाहीत तळ गाठल्यानंतर आता २०१७ च्या चौथ्या तिमाहीतील काही महत्त्वपूर्ण बदलांमुळे सकारात्मकता येण्याची चिन्हे-
फिक्की -नारडेको- नाईटफ्रँक इंडिया तर्फे त्यांच्या २०१७ च्या चौथ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर -डिसेंबर २०१७) नवीन रिअल इस्टेट सेंटिमेंट इंडेक्सचे प्रकाशन
नाईट फ्रँक इंडिया चे चीफ इकोनॉमिस्ट आणि नॅशनल डायरेक्टर डॉ. समंतक दास यांच्या मते ” मोठ्या प्रमाणावर पाहता पुरवठा क्षेत्रातील लोकांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल होतांना दिसून असून या करात विशेष करून रेरा आणि जीएसटी मधील महत्त्वपूर्ण बदल हे समजू लागल्याने हा बदल दिसून येत आहे. गेल्या दोन तिमाहीं मध्ये नकारात्म असा स्कोअर असतांना आता तो सकारात्मक दिसू लागला आहे, एकूणातच भविष्यासाठीही सकारात्मकता दिसू लागली असून तो स्तरही आता विशिष्ट पातळीवर आला आहे. विकासक आणि वित्तीय संस्था यांच्यातील भविष्यकालीन मानसिकता ही सुध्दा गेल्या दोन तिमाहीत नकारात्मकते कडे होती आता ती सुध्दा सकारात्मक बनली आहे. तरीही आर्थिक विश्लेषणातही पुढील सहा महिने फार फरक पडणार नाही. याचे कारण म्हणजे वाढती वित्तीय तूट, महागाई वाढण्याच्या वाढत्या अपेक्षा आणि व्याजदरांत कपात होण्याची वाट पाहणे ही होत. निवासी बाजारपेठेत नवीन प्रकल्प हे परवडणा-या किंवा मध्यम विभागात असतील , याचे मुख्य कारण म्हणजे सरकारी योजना होत. रेरा आणि जीएसटी ची अंमलबजावणी सुरू झाल्याने विक्री होण्यातही सकारात्मकता दिसू लागली आहे. पुढील सहा महिन्यांत ऑफिस बाजारपेठेत एक तर सुधारणा होईल किंवा सध्याच्या जागी ही बाजारपेठ स्थिर राहील पण नक्कीच कमी होणार नाही. पुढे जाता जाता आमचा असा विश्वास आहे की रिअल इस्टेट बाजारपेठेत अधिक पारदर्शकता येऊन अधिक संघटित लोक काम करू लागतील जेणेकरून बाजारपेठेत अधिक सकारात्मता वाढू लागेल.”
एकूण निष्कर्श –
· २०१७ च्या दुस-या आणि तिस-या तिमाहीत सलग सहा महिने नकारात्मकते नंतर सकरात्मक विचार पुन्हा बाजारपेठेत येऊ लागले असून सध्याचा स्कोअर हा ५२ वर गेला आहे. हे सर्व रिअल इस्टेट (रेग्युलेशन ॲन्ड डेव्हलपमेंट ) ॲक्ट २०१६ तसेच वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील काही सकारात्मक बदल यांमुळे झाले, वर्षाच्या सुरूवातीला बाजारपेठेत नकारात्मकता होती.
· बाजारपेठेतील भविष्यकालीन मानसिकता ही २०१७ च्या तिस-या तिमाहीत सर्वांत निचांक स्तरावर होती. पण काही पायाभूत बदलांमुळे अपेक्षा वाढून २०१७ च्या चौथ्या तिमाहीत स्कोअर ६४ वर गेला जो मागल्या तिमाहीत ५५ वर होता.
राष्ट्रीय राजधानी क्षेत्राने मारली सकारात्मक मुसंडी
· उत्तर विभाग हा असा एकमेव विभाग ठरला आहे ज्याने २०१७ च्या तिस-या तिमाहीत नकारात्मकता नोंदवली आहे. तरीही उत्तर प्रदशे आणि हरियाणा या दोन राज्यांमध्ये रेरा अस्तित्वात येईल या अपेक्षेने हा विभाग सकारात्मक बनला आहे. खरे पाहता नवीन निर्माण झालेल्या गुरूग्राम आणि पांचकुला येथील रेरा च्या बेंचेस ने हे मान्य केले आहे की राज्यातील चालू असलेले प्रकल्प ही या कायद्याच्या कक्षेत आणण्यात येणार असून याघोषणे मुळे ही बाजारपेठेत सकारात्मता अवतरली आहे.
वित्तीय संस्था आणि विकासकांची भविष्यासाठीची सकारात्मकता
· २०१७ च्या दुस-या आणि तिस-या तिमाहीत नकारात्मकता अनुभवल्यानंतर विकासक आणि वित्तीय संस्था या दोघांमधील सकारात्मकता ही २०१७ च्या शेवटच्या तिमाहीत वाढतांना दिसली. वित्तीय संस्थांचा स्कोअर हा १८ महिन्यांतील सर्वाधिक नोंदवला गेला.
रिअल इस्टेट बाजारपेठेने आर्थिक आघाडीवर बाळगले मौन
· २०१७ च्या चौथ्या तिमाहीत रिअल इस्टेट बाजारपेठेच्या आर्थिक अपेक्षा जवळपास स्थिर होत्या कारण ५२ टक्के लोकांनी सकारात्मकता दाखवली तर २०१७ च्या तिस-या तिमाहीत पुढील सहा महिन्यांकरता ५१ टक्के लोक सकारात्मक होते.
· भविष्यासाठी आर्थिक सहाय्य मिळण्याच्या अपेक्षा सुध्दा अशाच प्रकारे होत्या .
निवासी बाजारपेठ ही सकारात्मक
· अधिकतर लोकांच्या मते नवीन निवासी प्रकल्पांची सुरूवात होण्याच्या बाबतीत खूपच सकारात्मक मत आले, विशेषकरून सरकारने परवडणारी घरे बांधण्यावर दिलेला जोर हा सलग तीन केंद्रिय अर्थसंकल्पांत दिसून आला.
· २०१७ च्या चौथ्या तिमाहीत ५२ टक्के लोकांच्या मते विक्री मध्ये वाढ होईल , यांतून असे दिसून येते की गेल्या तिमाहीच्या तुलनेत असा विचार करणा-या लोकांमध्ये ही चांगली वाढ आहे.
· अधिकतर निवासी बजारपेठांमध्ये किंमती कमी होऊ लागल्या असल्या तरीही ५६ टक्के लोकाच्या मते पुढील सहा महिन्यांत निवासी घरांच्या किंमतीती वाढ होऊ लागेल.
व्यावसायिक बाजारपेठ राहणार स्थीर –
· २०१७ च्या चौथ्या तिमाहीत किमान ५४ टक्के लोकांच्या मते नवीन कार्यालयीन पुरवठा पुढील सहा महिन्यांत वाढू लागेल म्हणजेच गेल्या तिमाहीपेक्षा ही वाढ ३८ टक्के अधिक आहे. म्हणजेच २०१६ च्या चौथ्या तिमाहीत ही सर्वाधिक सकारात्मकता आहे.
· त्याचप्रमाणे ५६ टक्के लोकांच्या मते २०१७ च्या चौथ्या तिमाहीत कार्यालयील भाड्यात वाढ होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच २०१७ च्या तिस-या तिमाहीत ही वाढ केवळ ३८ टक्के होती.
