भारतीय शिक्षण व्यवस्था निर्बुद्ध पिढी घडवत आहे : तुषार गांधी

Share this News:

पुणे:  देशातील शिक्षण प्रणालीवर हल्ला चढवत महात्मा गांधी यांचे पणतू आणि नामवंत लेखक तुषार गांधी रविवारी म्हणाले, की ही व्यवस्था देशाच्या इतिहासातील सर्वात निर्बुद्ध पिढी घडवत आहे. शिक्षणातील अधःपतनाबद्दल धोक्याचा इशारा देताना ते म्हणाले, “आम्ही विद्यार्थ्यांना साचेबद्ध विचार करणारे यंत्रमानव बनवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्याला याची खरोखर गरज आहे का?”  एव्हरग्रीन एज्युकेश फाउंडेशनचे

शिक्षणतज्ज्ञ अनिस कुट्टी यांनी रविवारी पुण्यात  हॉटेल कोनराड येथे आयोजित केलेल्या नॅशनल एज्यु-स्टार्टअप कॉन्फरन्स 2016 दरम्यान देशभरातील 150शिक्षणतज्ज्ञांसमोर बोलताना तुषार गांधी यांनी हा प्रश्न विचारला.

मुख्य वक्ते असलेल्या गांधी यांनी  उच्च (विद्यापीठीय) शिक्षण हे वस्तू बनला असल्याची संभावना करत त्यावर टीका केली.”शिक्षणाचे पूर्ण केंद्रीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तसे केले जाऊ नये. महात्मा गांधी यांनी म्हटल्याप्रमाणे लोकांच्या गरजांना अनुसरून शिक्षणाचे वैयक्तिकीकरण करायला हवे. ते मुक्त करणारे असावे, गुलाम बनवण्याचा उद्देश असणारे नव्हे,” असे ते म्हणाले.

गांधी म्हणाले, “मानवी मूल्ये आणि नीतिमूल्ये यांबद्दल आस्था नसणाऱ्या असंवेदनशील नोकरशहा व निरक्षर राजकारणी यांचे शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण आहे. त्यामुळे त्यांच्या देखरेखीखाली दिलेल्या शिक्षणाने फक्त जुन्या आणि नवीन पिढीलाच निर्बुद्ध केलेले नाही, तर  बाजारात रोजगार शोधणाऱ्या गुलामांची निर्मिती करणारे ते कारखाने बनले आहेत,” असे ते पुढे म्हणाले.

अभियंत्यांवर टोमणा मारताना गांधीम्हणाले, की उदारमतवादी कला हा शिक्षणाचे एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून पुढे आणायची वेळ आली आहे. “पुनर्शिक्षण आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचाराच्या व्यक्ती बनण्यासाठी उदारमतवादी कला या ठोस आधार पुरवतात. समाजाकरिता  एखादा अभियंता हा विचारी प्राणी असावा लागतो, कारखान्यातील गुलाम नव्हे,” असे ते म्हणाले.

परिषदेचा मुख्य विषय मांडून एव्हरग्रीन एज्युकेशन फाऊंडेशनचे अध्यक्ष अनिस कुट्टी म्हणाले, की सर्जनशीलता आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या शाश्वत मूल्यांवर आधारित कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसमान एकात्मिक अभ्यासक्रम तयार करणे हा या परिषदेचा प्रयत्न आहे.

ते पुढे म्हणाले, “परिषदेला उपस्थित असलेल्या शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांना  फायदेशीर माहितीपूर्ण सत्र प्रदान करून आणि मुख्य म्हणजे व्यावहारिक पद्धतींनी त्याचे  अनुसरण करून शिक्षणात क्रांती घडवून आणण्याचे आमचे ध्येय आहे. नावीन्यपूर्णतेच्य माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रितकरणाऱ्या स्टार्ट-अप्सना प्रोत्साहित करण्याचीही यापरिषदेची योजना आहे,” असे ते पुढे म्हणाले. या परिषदेतील फलित एका हस्तपुस्तिकेत मांडून ती मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविली जाईल.

विश्वास महाजन, मंजिरी देसाई, एस. जी. सूर्या, अॅलन दास, कीर्ती जयकुमार आणि आकाश चंद्रन यांचा अन्य मान्यवर वक्त्यांमध्ये समावेश होता. माजी मंत्री शशी थरूर यांनी वेबिनारद्वारे उपस्थितांना संबोधित केले.

एव्हरग्रीन एज्युकेशन फाउंडेशनची स्थापना श्री. पी.मोहम्मद कुट्टी यांच्या नेतृत्वाखाली 1997 मध्ये झाली होती. अल्पसंख्यक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देने, हे त्यांचे स्वप्न होते. याकरितागणिताचे प्राध्यापक असलेले त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिस कुट्टी यांनी त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली.तोपर्यंत श्री. अनिस कुट्टी यांनी पुण्यात गणिताचे तज्ज्ञ म्हणून ख्याती मिळविली होती आणि भारताची सर्वात प्रतिष्ठित संरक्षण प्रशिक्षण अकादमी असलेल्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते. त्यावेळी वडील आणि मुलगा या दोघांनीही ठरविले, तकी समाजातील वंचित घटकांपर्यंत पोचण्याची हीच वेळ आहे.

या स्वप्नाच्या पूर्तीसाठी पिता आणि पुत्र या दोघांनीही समाजासाठी आणि समाजातील वंचित घटकांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनुसरून मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वाघोली भागात छोटी शाळा सुरू केली. ते अनाथ आणि विद्यार्थ्यांसाठी कार्य करतात.या दोघांनी आतापर्यंत मागास समुदायातील शेकडो विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून मदत केली आहे.