भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी संविधान संरक्षण समितीच्यावतीने खासदार अनिल शिरोळे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर “धरणे आंदोलन “

Share this News:

भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी भूमिका स्पष्ट करण्यासाठी संविधान संरक्षण समितीच्यावतीने पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांच्या घोले रोडवरील जनसंपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .

भीमा कोरेगाव रणस्तंभ अनुयायांचे शक्तीस्थान आहे . दोनशे वर्ष झाल्याचा आनंद भीम अनुयायांमध्ये होता . १ जानेवारी २०१८ रोजी लाखोंच्या संख्येने भीम अनुयायी नेहमीप्रमाणे मानवंदना देण्यासाठी आले असताना बेसावध अनुयायांवर धार्मिक व जातीयवादी मानसिकतेतून संमोहित केलेल्या हजारो तरुणांना भगवे ध्वज हातात दंगल घडविण्याची चेतावणी दिली . अशा सडक्या मेंदूच्या मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांनी पूर्ण नियोजन करून दंगल भडकविली . या प्रकरणात मिलिंद एकबोटे व मनोहर भिडे यांना भाजप सरकार संरक्षण देउन भाजप सरकार वेळ काढूपणा करत आहे . सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे . त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जमीन मंजूर करून मिलिंद एकबोटे याना सवलत भाजप सरकार देउ केली आहे भाजप सरकार हे जाणूनबुजून करत आहे .

पुण्याचे खासदार अनिल शिरोळे हे भारतीय संसदेमध्ये पुणे शहराचे प्रतिनिधित्व आपण करत असून देखील आपण आपली भूमिका संसदेमध्ये व माध्यमांसमोर मांडताना दिसत नाही . त्यामुळे जनसंपर्क कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले .

या आंदोलनात पुणे शहर जिल्ह्यामधील ४५ विविध पक्ष संघटनांनी सहभाग घेतला . या आंदोलनात संजय भिमाले , धनंजय सोनवणे , दत्ता पोळ , विनोद साळवे , नागेश भोसले , सुहास बनसोडे , विजय जगताप , अमोल तुजारे , शरद ओव्हाळ , ऍड. किरण कदम , शाम गायकवाड , नीता आडसुळे , अमर पडा गळे , सागर वानखेडे राजेश खडके आदी मान्यवर सहभागी झाले होते .