रिक्षा चालकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होतील :बाबा कांबळे

IMG-20180626-WA0487.jpg
Share this News:

रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती व महाराष्ट्र रिक्षा पंचायतच्यावतीने पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर रिक्षाचालकांची तीव्र निदर्शन आंदोलन करून घोषणा दिल्या. त्यानंतर आदेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

पंचायत अध्यक्ष: कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या निदर्शन आंदोलनात आनंद तांबे , अशोक साळेकर , शीला डावरे, विजय रवळे ,एकनाथ ढोले, नितिन शिंदे, आनंद अंकुश , दत्ता पाटील , सदाशिव पवार , राजू पोटे, प्रदीप भालेराव , सोमनाथ कलाटे , बाबासाहेब डुंबरे आदी उपस्थित होते ,

या वेळी बाबा कांबळे म्हणाले. रिक्षा चालकांच्या प्रश्नांवर महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आज महाराष्ट्रातील सर्व आर टी ओ कार्यालय समोर रिक्षा चालक आंदोलन केले आहे,रिक्षा चालकांचे प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे यामुळे रिक्षा व्यवसाय अडचणीमधे आला असून रिक्षा चालकामधे सरकार विरोधात तीव्र संताप आहे सरकारने रिक्षा चालकांचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवावेत अन्यथा याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा बाबा कांबळे यांनी दिला,

१)केंद्र सरकारने मंजूर केलेले नवीन वाहन मोटर विधेयक रद्द करावे.

२)बजाज टी व्ही एस ,पियाजियो या कंपनी आणि त्यांचे रिक्षाविक्रेते (डीलर) यांच्या वतीने रिक्षा चालकांकडून आर.टी.ओ. टॅक्सच्या नावाखाली आणि बँक लोनच्या जास्त रकमेची लूट केली जात आहे, ती थांबलीच पाहिजे.

३)पुणे पिंपरी-चिंचवड शहरातील बेकायदेशीर वाहतूक बंद झाली पाहिजे.

४) रिक्षा चालक-मालकांसाठी सरकारने कल्याणकरी मंडळाची घोषणा केली त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे.

५) ओला उबेर या भांडवलदार कंपन्यांच्या वतीने बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे यामुळे या सर्व कंपन्या बंद कराव्यात.

६) रिक्षा इन्सुररेन्समध्ये भरमसाटी वाढ रद्द करावी.

या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले,

प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजारी यांनी रिक्षाचालकांचे निवेदन स्वीकारले .