लष्कर भागातील विसर्जन मिरवणूक सहा तासात उत्साहात संपन्न

Share this News:

पुणे लष्कर भागातील सर्वधर्मिय  बांधव  सहभाग असणारी प्रसिध्द असलेली विसर्जन मिरवणूक सहा तासात उत्साहात संपन्न झाली . या विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ    सायंकाळी साडेसहा वाजता भोपळे चौकात मानाचा पहिला गणपती  कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पुढे राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आली . यावेळी लष्कर विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त निलेश मोरे , लष्कर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत कुंवर , कामाठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष देवेंद्र कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते . आकर्षक सजावटीमध्ये आपली  मंडळाने आपल्या श्री ची  मूर्ती विसर्जन मिरवणूक काढली होती तर सिंहगर्जना पथकाच्या ढोल पथकाच्या लयबध्द तालावर  मंडळाचे कार्यकर्ते नृत्य करीत होते .

या विसर्जन मिरवणुकीत भीमपुरा गल्लीमधील श्री राजेश्वर तरुण मंडळ , कोळसेगल्लीमधील नवमहाराष्ट्र व्यायाम मंडळ , ताबूत स्ट्रीटवरील ताबूत स्ट्रीट तरुण मंडळ , राणी लक्ष्मीबाई  उद्यानाजवळील शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, भवानी पेठेमधील श्री. शिवाजी मित्र मंडळ ट्रस्ट , भोपळे चौकातील श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ , हिंद तरुण मंडळ , शिंपी आळीमधील नवयुग तरुण मंडळ , गाडीअड्डा येथील शिव तरुण मंडळ ट्रस्ट , कुंभारबावडी बाजारमधील कुंभारबावडी तरुण मंडळ , कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळ ,जाफरींन लेनमधील नवयुग सुवर्णकार तरुण मंडळ , नवा मोदीखानामधील विश्व् तरुण मंडळ , कमलमळामधील शिवशक्ती कमलमळा तरुण मंडळ ,नवा मोदीखानामधील  उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट , सर्वात शेवटी शंकरसेठ रोडवरील धोबीघाट मित्र मंडळ ट्रस्ट आदी मंडळ सहभागी झाले होते .

यंदाच्या वर्षी  श्री दत्त समाज तरुण मंडळ , श्रीपाद तरुण मंडळ , श्रीकृष्ण तरुण मंडळ , दस्तूर मेहेर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ,श्री शिवराम तरुण मंडळ या मंडळांनी जाग्यावर विसर्जन केले . तर जय जवान मंडळाने नवयुग तरुण मंडळाबरोबर आपली विसर्जन मिरवणूक काढली . हिंद तरुण मंडळाने  देशभक्तीपर नृत्ये सादर केली . हि नृत्ये बघण्यासाठी गर्दी झाली होती . तर शिवांध ढोलपथकाने सहभागी झाले होते . उत्सव संवर्धक खाण्या मारुती देवस्थान मंडळ ट्रस्ट फुग्यांची सजावट केली होती . कुंभारबावडी स्थायिक सेवा सेवा मंडळाने शंकर महादेव त्रिशूल देखावा , नवयुग सुवर्णकार तरुण मंडळाने आकर्षक फुलांची सजावट , धोबीघाट मित्र मंडळाने बजरंगबली हनुमान हलता देखावा , विश्व् तरुण मंडळाने विठ्ठल रुक्मिणी , संत तुकाराम , संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमाचा देखावा , श्रीकृष्ण तरुण मंडळाने शिवमहल देखावा सादर केला होता .

शिवमुद्रा प्रतिष्ठान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने युवक सहभागी होऊन संगीताच्या तालावर नृत्यात सहभागी झाले होते . लष्कर भागातील हे एकमेव मंडळ लक्ष्मी रोडमार्गे शहराच्या मुख्य मिरवणुकीत सहभागी झाले . त्यानंतर श्रीमंत साईनाथ तरुण मंडळ देखील शहराच्या टिळक रोडवरील मिरवणुकीत सहभागी झाले . हिंद तरुण मंडळामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने यंदाच्या वर्षी देखील सहभागी झाल्या होत्या . तर ताबूत स्ट्रीट तरुण मंडळाच्या मिरवणुकीत दोन बालचमूंनी आकर्षक नृत्ये सादर करून सर्व उपस्थितांची मने जिंकली . बुटी स्ट्रीटवरील वीर शैव लिंगायत गवळी समाजाचा पापा वस्ताद गवळी तालीम आपली विसर्जन मिरवणूक सकाळी काढली . या मिरवणुकीत गवळी समाज बांधव सहभागी झाले होते . तसेच भगवे फेट्यामध्ये महिला सहभागी झाल्या होत्या . मंडळाच्या स्वतःच्या ढोल लेझीम पथकाच्या तालावर झिम्मा फुगडी खेळत होत्या .

पोलीस बंदोबस्त

या विसर्जन मिरवणुकीसाठी १ सहाय्यक पोलीस आयुक्त , ६  पोलिस निरीक्षक , १६ पोलिस अधिकारी , २२५ पोलिस कर्मचारी वर्ग , १५ होमगार्ड , ३० पोलिस मित्र विशेष परिश्रम घेतले . सर्वांच्या सहकार्यामुळे हि विसर्जन मिरवणूक शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली असे लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांनी सांगितले .

विविध सामाजिक संस्थांच्यावतीने स्वागत

पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीच्यावतीने सेंटर स्ट्रीट पोलीस चौकीजवळ स्वागत कक्ष उभारून सर्व मंडळाचे बापूसाहेब गाणला यांनी श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी इसाक जाफर , अच्युत निखळ , इमाद सय्यद , रे फर्नाडिस , बलबीरसिंग कलसी , रणजित परदेशी , संदीप भोसले , पोपट गायकवाड , मन्नू कागडा आदी उपस्थित होते . तसेच ऑल इंडिया जमेतुल कुरेशी वर्किंग कमिटीच्यावतीने कुरेशी मस्जिद येथे स्वागत कक्ष उभारून हसन कुरेशी यांनी सर्व मंडळाचे  श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन स्वागत केले . यावेळी सादिक कुरेशी , अब्दुल कुरेशी , आरिफ कुरेशी , अबरार कुरेशी , अब्बास कुरेशी , राजी कुरेशी व युसूफ बागवान आदी मान्यवर उपस्थित होते . इंडियन मुस्लिम फ्रंटच्यावतीने मंडळाचे स्वागत  फ्रंटचे अध्यक्ष मुन्नवर कुरेशी यांच्या हस्ते  श्रीफळ आणि पुष्पगुछ देउन करण्यात आले .कर्तव्य फाउंडेशनच्यावतीने सर्व मंडळाचे विकास भांबुरे , अशोक देशमुख , निलेश कणसे , अय्युब खान यांनी स्वागत केले .

पुलगेटजवळील डेक्कन टॉवरमागील नवा कालव्यावर  भीमज्योत मित्र मंडळाच्यावतीने  जीव रक्षक आणि अग्निशमन कर्मचारी बांधवाना अल्पोपहार वाटप  मंडळाचे अध्यक्ष नितीन आडसुळे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी विजय वैराट , पिंटू साळवी , विशाल गायकवाड , आनंद शितोळे , आदींनी विशेष परिश्रम घेतले .

 विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून – आदर्श सामाजिक उपक्रम

लष्कर भागातील सैफी लेनमधील श्री शिवराम तरुण मंडळाने आपली विसर्जन मिरवणूक रद्द करून त्या खर्चामधून एक रुग्णास व्हील चेअर , अपंगास तीन चाकी सायकल , दोन रुग्णांना कुबड्या लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर यांच्याहस्ते देण्यात आल्या . अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष असिफ शेख यांनी दिली . तसेच गणेशोत्सव काळात दहा दिवस अन्नदान आणि महिलांना साड्या वाटप करण्यात आले .

पोलीस मित्र

पूना कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ३० युवकांनी विसर्जन मिरवणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस मित्र म्हणून काम केले . ट्रायलक चौक , गुडलक चौक , कुरेशी मस्जिद चौक , भोपळे चौक येथे या युवकांनी पोलीस मित्र म्हणून काम केले .