लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मातंग समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न व  शाखा उदघाटन

Share this News:

कोंढवा बुद्रुक मध्ये काकडे नगर येथे लहुजी शक्ती सेनेच्यावतीने मातंग समाजाचा मेळावा उत्साहात संपन्न व शाखा उदघाटन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन जोगदंड व लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

मातंग समाज मेळाव्यात मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी प्रमुख मार्गदर्शन लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांनी केले . लहुजी शक्ती सेना मातंग समाजामध्ये परिवर्तन घडविण्यासाठी लहुजी शक्ती सेना कार्य करीत आहे .मातंग समाजाच्या न्याय हक्कासाठी लहुजी शक्ती सेना रस्त्यावर उतरून आपला अधिकार मिळवावा लागेल . यासाठी सर्व मातंग समाजाने एकत्रित येऊन लढा उभारला पाहिजे .

या मेळाव्याचे आयोजन लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहर सरचिटणीस नितीन यादव व हडपसर विधानसभा उपविभागप्रमुख तुषार चव्हाण व नियोजक लहुजी शक्ती सेनेचे पुणे शहर संपर्क प्रमुख नामदेव घोरपडे व प्रभाग क्र ४१ कोंढवा बुद्रुक हडपसर विधानसभेतील सर्व पदाधिकारी व मातंग समाज बांधवानी केले होते