वनप्लस ६ सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशनची विक्री ५ जून २०१८ पासून सुरू

OnePlus.jpg
Share this News:


वनप्लस
या प्रीमिअम अँड्रॉइड स्मार्टफोन निर्मात्याकंपनीने आज वनप्लस सिल्क व्हाइट लिमिटेडएडिशन फोनची विक्री जून २०१८ पासून सुरू होणारअसल्याची घोषणा केली आहे. ही विक्री अॅमेझॉन.इनआणि वनप्लस.इन या संकेतस्थळांवर होणार आहे.वनप्लसने आपल्या अद्ययावत फ्लॅगशिप असलेल्यावनप्लस या फोनची बहुप्रतिक्षित अशी वनप्लस सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन ही नवीन आवृत्ती आहे.

वनप्लस सिल्क व्हाइट लिमिटेड एडिशन ही फक्तसौंदर्यतेची प्रतिकृती नसून लाघवी टेक्चर असलेल्या याफोनमुळे वनप्लस ब्रँडला चार चाँद लागले आहेत.तंतोतंत पॉलिश केल्यामुळे दिसण्यात आणि फोनचाअनुभव घेण्यात एक अभिजातपणा तयार झाला आहे.या फोनसाठी पर्ल पावडरचा वापर करण्यात आला असून त्यामुळे एक सूक्ष्म झुमके देणारा इफेक्ट मिळतो. या डिव्हाइसवर ग्लासचे सहा लेयर काळजीपूर्वक बसविण्यात आले असून त्यामुळे सहज आणि व्हाइट टेक्चर प्रदान होते. हा प्रीमिअम डिव्हाइस स्नॅपड्रॅगन ८४५, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येत असून त्यामुळे वेग आणि सहजतेचा एक अनोखा आविष्कार जुळून आला आहे.